घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात पोलीस भरतीमध्ये अजून 7 हजारांची वाढ; उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात पोलीस भरतीमध्ये अजून 7 हजारांची वाढ; उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Subscribe

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. यात विधानसभेत शहरांमधील कायदा सुवस्थेबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरतीचा प्रश्न उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कमी पडत असल्याचेही अजित पवार म्हणाले.

ज्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना पोलीस भरतीबाबत पुन्हा मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 7 पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रियेला मान्यता दिली असून ज्यात अजून 7 हजार पदांची वाढ केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले की,  महाराष्ट्रामध्ये 7 हजार जणांची पोलिस भरती सुरू असताना अजून 7 हजार जणांची पोलिस भरती होणार असल्याची माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पोलिस भरतीच्या माध्यमातून अनेक तरूण पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करत असतात. असही त्यांनी नमूद केलं आहे.

नवी मुंबईतील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध्य गोष्टींबाबत आज आमदार मंद्र म्हात्र यांनी लक्षवेधी मांडली, यावर अजित पवार यांनी सरकारला उपप्रश्न केला. महाराष्ट्रात विकसित झालेल्या शहरांमध्ये पोलीस विभाग असायला हवा, मात्र तेवढा मोठा पोलीस विभाग नसल्याने शहरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमी पडत आहे. त्यामुळे पोलीस भरती कधी करणार असा प्रश्न अजित पवार यांनी लक्षवेधीमधून उपस्थित केला.

- Advertisement -

गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत गृहविभाग कारवाई करणार का?

आमदार मंदा म्हात्रेंच्या लक्षवेधीवर अजित पवार यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की, नवी मुंबई येथे अटक केलेले गुन्हेगार महिन्याभरात जामिनावर सुटून पुन्हा दहशत पसरवण्याचे काम करतात. या भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. ते झाल्यास नवी मुंबईतील परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा निर्णय गृहविभाग घेणार का? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.


हा तर खोके विरुद्धचा ओके सामना; प्रसाद लाड यांची विरोधकांवर जळजळीत टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -