घरमहाराष्ट्रनाशिकऑडिटच्या मुद्यावर सत्ताधार्‍यांचे मौन का ? : अ‍ॅड. ठाकरे

ऑडिटच्या मुद्यावर सत्ताधार्‍यांचे मौन का ? : अ‍ॅड. ठाकरे

Subscribe

नाशिक : मविप्र संस्थेचे कामकाज पारदर्शी असल्याचा खोटा दावा सरचिटणीसांकडून केला जातो. परंतु, संस्थेच्या लेखापरीक्षणाबाबत का बोलले जात नाही. सभासदांपासून ऑडिट रिपोर्ट दडविला जात आहे. जिल्ह्यात मराठा समाजाचे ऑडिटर असतांना इतर व जिल्ह्याबाहेरील ऑडिटर नेमण्याचे कारण काय, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन परिवर्तन पॅनलचे नेते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले.

संस्थेचे ऑडिटर म्हणून काम करत असलेल्या मराठा समाजाच्या ऑडिटरला हीन वागणूक देऊन् अधिकृत ऑडिटरला अनेक महिने ऑडिट करण्यासंदर्भात पत्र दिले जात नव्हते. नगरच्या दुसर्‍या ऑडिटर संस्थेला काम दिले असताना त्यांना काम जमले नाही. तत्कालीन पदाधिकार्‍यांनी शरणागती पत्करुन पुन्हा आधीच्या ऑडिटरला नेमणुकीचे पत्र दिले. या प्रकाराबाबत बोलणे टाळले जात असून, यातून पितळ उघडे पडण्याची भीती संबंधितांना वाटत आहे, असा थेट आरोप अ‍ॅड. ठाकरे यांनी केला. बागलाण दौर्‍यात परिवर्तन पॅनलच्या कंधाने, वीरगाव, करंजाड, द्याने, नामपूर, लखमापूर येथे सभा झाल्या. यावेळी बाळासाहेब क्षीरसागर, दिलीप दळवी व डॉ. प्रसाद सोनवणे यांनी विजयी निर्धार व्यक्त केला. शिरीष राजे यांनी आपल्या अभ्यासू भाषणाने अनेक मुद्यांना स्पर्श करत गंभीर सवाल उपस्थित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -