घरमहाराष्ट्रनाशिकदुष्काळ निधी आठ दिवसांत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हाती; शासनाचा दिलासा

दुष्काळ निधी आठ दिवसांत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हाती; शासनाचा दिलासा

Subscribe

शासनाकडून ८५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्त

दुष्काळग्रस्त शेतकयार्‍यांच्या मदतीसाठी नाशिक जिल्हयासाठी ४१६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापेैकी ८५ कोटींचा पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी येत्या आठ दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, बागलाण, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, चांदवड, देवळा या आठ तालुक्यासह १७ मंडळात दुष्काळ जाहीर झाला आहे. डिसेंबरपासूनच तीव्र टंचाईच्या झळा जाणवू लागल्याने ग्रामीण भागात टँकरद्वारेे पाणीपुरवठा होत आहे. आजमितीस जिल्हयात १२२ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील लहान व मोठे अशा २४ प्रकल्पांत अवघा ४० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दोन हजार कोटींचे विशेष पॅकेज देऊ केले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी एकूण ४१६ कोटी ३२ लाख रुपये मंजूर झाले असून यात शेतपिकांच्या नुकसानीसाठी ३५१ कोटी ११ लाख तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी ६५ कोटी २१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १७० कोटी रुपयांचा पहिला हप्ता विभागीय आयुक्तांकडे वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ८५ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. २०१८ मधील खरीप हंगामातील सातबारावरील पिकांच्या नोंदीच्या आधारे करण्यात येणार आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -