घरमहाराष्ट्रनाशिकभरधाव कारने घेतला तरुणाचा बळी; नाशिकमधील रविशंकर मार्गावरील दुर्घटना

भरधाव कारने घेतला तरुणाचा बळी; नाशिकमधील रविशंकर मार्गावरील दुर्घटना

Subscribe

ऱविशंकर मार्गावरुन वडाळागावमार्गे पुणे महामार्गाकडे भरधाव जात असलेल्या इर्टिगा कारने दुचाकीस्वारासह रस्त्यालगत उभ्या दोन वाहनांना जोरदार धडक दिली. प्रचंड सुसाट वेगातील ही कार धडकेनंतरही न थांबता थेट रस्त्यातील नाल्याच्या कठड्यावर जाऊन थांबली. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

ऱविशंकर मार्गावरुन वडाळागावमार्गे पुणे महामार्गाकडे भरधाव जात असलेल्या इर्टिगा कारने दुचाकीस्वारासह रस्त्यालगत उभ्या दोन वाहनांना जोरदार धडक दिली. प्रचंड सुसाट वेगातील ही कार धडकेनंतरही न थांबता थेट रस्त्यातील नाल्याच्या कठड्यावर जाऊन थांबली. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राकेश चव्हाण (२१) हा तरुण मोपेड गाडीवरुन (एम.एच.१५, जीएच-७०७६) कॉलनी रोडने रविशंकर मार्गाकडे वळत असतानाच वडाळागावाकडून भरधाव येणाऱ्या इर्टिगा कारने (आर.जे.४२ यूए ११४१) राकेशच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यात राकेश दूर अंतरावर जाऊन पडला. तर, दुचाकीचेही दोन तुकडे झाले. अपघातग्रस्त इर्टिगा त्यानंतरही पुढे स्विफ्ट डिझायर कार (एम.एच१५, एफव्ही ५८९५) आणि टाटा इंडिका (एम.एच०३ एएम ५१५९) या दोन्ही कारवर जाऊन आदळली. सुदैवाने या दोन्हीही गाड्या रस्त्यालगत उभ्या असल्याने मोठा अनर्थ टळला. इर्टिगामध्ये पाठीमागील सीटवर झोपेत असलेला सचिन शिवाजी पवार (३०, रा.जेलरोड) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -