घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनवीन नाशिकमध्ये एकाच दिवशी चौघांच्या आत्महत्या

नवीन नाशिकमध्ये एकाच दिवशी चौघांच्या आत्महत्या

Subscribe

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवश चार जणांनी अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत, उपेंद्रनगर येथील रामदास मुरलीधर रोकडे (वय ५०, रा. सहावी स्कीमसमोर, उपेंद्रनगर) यांनी सोमवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर समाधान काशीनाथ रोकडे यांनी अंबड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत, कर्मयोगीनगर येथील सागर रतन कुमार (वय २९, रा. रुंगटा रोझॉन पार्क अपार्टमेंट, कर्मयोगीनगर, अंबड) याने राहत्या घराच्या बेडरूममध्ये फॅनच्या सिलिंग कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर सुयोग रतनकुमार ढेपे यांनी ही माहिती अंबड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तिसर्‍या घटनेत, उंटवाडीजवळ येथील रवींद्र मन्साराम पाटील (वय ४८, रा. कालिका पार्क, उंटवाडी, नाशिक ) यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये पंखा व भिंतीच्या हुकाला बांधलेल्या लहान बाळाच्या झोक्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

चौथ्या घटनेत, कामटवाडा येथील महेश मधुकर आडीवडेकर (वय ३३, रा. विठ्ठलनगर) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्याचा मावसभाऊ आकाश संजय घाडगे याच्या लक्षात आल्यानंतर त्याने अंबड पोलीस ठाण्यास ही माहिती कळविली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -