घरमहाराष्ट्रप्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी अन् २०२४ मध्ये...; रामदास आठवलेंची...

प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी अन् २०२४ मध्ये…; रामदास आठवलेंची भन्नाट चारोळी

Subscribe

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीन तास चर्चा झाली. पवार आणि प्रशांत किशोरांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत चारोळी करत प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री  बनणार नाहीत नरेंद्र मोदी? असं रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत म्हटलं आहे. प्रशांत किशोर हे २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींसोबत होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते तरीही २०१९ च्या निवडणुकीत ३०३ जागा मिळवीत मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही त्या राज्यातही भाजपला विजय मिळालेला आहे. त्यामुळे माझे म्हणणे आहे प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी कारण २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी असं रामदास आठवले म्हणाले.

- Advertisement -

- Advertisement -

विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही

विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीए सोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या २०२४ च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -