घरमहाराष्ट्रनाशिकग्रामपंचायती समोरच दिला अग्निडाग

ग्रामपंचायती समोरच दिला अग्निडाग

Subscribe

चांदवड तालुक्यातील घटनेमुळे खळबळ

नाशिक : चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे दोन वर्षांपूर्वी स्मशान भूमी बांधण्यात आलेली आहे. परंतु सदर स्मशानभूमी ही ग्रामपंचायत हद्दीत नसून ती वैयक्तिक जागेत बांधलेली आहे. या जागेत आजुबाजूचे नागरिक कोणासही अंतिम संस्कार करण्यास विरोध करतात. शुक्रवार (दि. १५) रोजी कोळीवाडा येथील रहिवासी अमोल अशोक कोकाटे यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या अंतिम संस्कारासाठी त्यांचे नातेवाईक येथील स्मशानभूमीत आले असता तेथील रहिवाशांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी मृताचे नातेवाईक संतप्त झाले. तेथील वातावरण तणावपूर्ण असताना मृताच्या नातेवाईकांनी सरळ चांदवड ग्रामपंचायत गाठली व तेथील परिसरातच मृतास अग्निडाग दिला. ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांनी त्यांना विरोध केला, परंतु वातावरण तणावपूर्ण असल्याने नातेवाईकांनी तेथेच मृताचे अंतिम संस्कार पूर्ण केले.

- Advertisement -

अशा घटनेमुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. यापुढे अशा घटना घडू नये व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी अजय पूरकर यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दाखल करण्यासाठी निवेदन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -