घरमनोरंजनKGF Chapter 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'KGF 2' चा...

KGF Chapter 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर ‘KGF 2’ चा धुमाकूळ, तिसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई

Subscribe

बॉक्स ऑफिसवर KGF Chapter 2 चा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अनेक नवे अध्याय लिहित आहे. ज्याच्या पलीकडे जाणे इतर कोणत्याही चित्रपटाला जमणे जवळपास अशक्य आहे. पहिल्या दोन दिवसांतच जगभरात 270 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने रविवारपर्यंत 500 कोटींचा आकडा पार केल्याचे समोर येतेय. तर दुसरीकडे हिंदी व्हर्जनने सलग तिसऱ्या दिवशी 40 कोटींहून अधिकची कमाई करत नवा विक्रम रचला. हिंदीत रिलीज झालेला हा पहिला चित्रपट असेल ज्याने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत 100 चा टप्पा ओलांडला आहे.

यावरून कन्नड सुपरस्टार यशने त्याचे ‘रॉकिंग’ हे टायटल बरोबर सिद्ध करून दाखवले आहे. KGF 2 च्या प्रत्‍येक भाषेतील चित्रपट कलेक्‍शनचे रेकॉर्ड मोडीत काढत आहे. कलेक्शनच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 93 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच हिंदीत 48 कोटींचा गल्ला जमवला आहे.

- Advertisement -

एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, KGF ने तिसऱ्या दिवशी कन्नडमध्ये 13.50 कोटी, तेलुगूमध्ये 16 कोटी, तमिळमध्ये 8 कोटी आणि मल्याळममध्ये 7 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची तिसर्‍या दिवशीची नेटवर्थही देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 80 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तर हिंदीमध्ये नेट कलेक्शन 42 कोटी असू शकते.

बाहुबलीचा रेकॉर्ड काढला मोडीत

यश, रवीना टंडन, प्रकाश राज आणि संजय दत्त स्टारर हिंदी पट्ट्यातील या चित्रपटाने कमाईचे झेंडे रोवले आहेत. तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला असून, तिसऱ्या दिवशी कलेक्शन 142 कोटींवर पोहोचले आहे. तर त्याचवेळी बाहुबली 2 ने तीन दिवसांत 128 कोटींची कमाई केली होती.

- Advertisement -

बॉक्स ऑफिस ठरला मैलाचा दगड

याआधी ‘बाहुबली 2’, ‘दंगल’, ‘संजू’, ‘टायगर जिंदा है’, ‘बजरंगी भाईजान’, ‘वॉर’, ‘सुलतान’, ‘धूम 3’, ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘ ‘हॅपी न्यू इयर’ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली होती. मात्र करिष्मा पूर्ण करण्यासाठी KGF ला फक्त दोन दिवस लागले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -