घरक्रीडाIPL-BCCI Payment Rules : दीपक चहरला मिळणार का १४ कोटींच्या लिलावाची रक्कम...

IPL-BCCI Payment Rules : दीपक चहरला मिळणार का १४ कोटींच्या लिलावाची रक्कम ? जाणून घ्या बीसीसीआयचा खास नियम

Subscribe

भारतीय वेगवान गोलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू दीपक चहरला आयपीएल २०२२ च्या संपूर्ण हंगामातून बाहेर ठेवण्यात आले आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दीपक चहरला दुखापत असल्यामुळे तो संघात सहभागी होऊ शकला नाही. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो उर्वरित हंगामातून बाहेर पडला.

दीपक चहर चार वेळा चॅम्पियन असलेला चेन्नईचा प्रमुख खेळाडू आहे आणि गेल्या काही वर्षांपासून तो संघात उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. फ्रँचायझीने देखील त्याच्यावर विश्वास दाखवला आणि मेगा लिलावात त्याच्यावर मोठी रक्कम खर्च केली. त्याला चेन्नईच्या संघात १४ कोटी रूपयांना घेण्यात आले.

- Advertisement -

चहर १५व्या हंगामातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या लिवावाच्या रकमेबाबत चर्चेला उधाण आलं आहे. चेन्नईच्या गोलंदाजाला मिळालेल्या १४ कोटींच्या रकमेचे काय होणार? त्याचा मोबदला मिळणार की, तो रिकाम्या हाताने जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

नियमानुसार, जर एखादा खेळाडू आयपीएलमध्ये एकही सामना न खेळता संपूर्ण हंगामातून बाहेर राहिला. तर त्याला लिलावाचे पैसे मिळत नाहीत. मात्र, आयपीएलदरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च फ्रँचायझी करते आणि त्याला लिलावाचे पैसेही मिळतात. पण बीसीसीआयच्या कराराबद्ध खेळाडूंसाठी हा नियम थोडा वेगळा आहे.

- Advertisement -

जर एखाद्या खेळाडूने संघातील कॅम्पमध्ये रिपोर्ट केलं आणि हंगाम सुरू होण्यापूर्वी दुखापत झाली. तर तो खेळाडू पुढील कोणत्याही सामन्यात भाग घेऊ शकत नाही. तसेच तो लिलावातील रकमेच्या ५० टक्के रकमेचा हक्कदार असतो. या प्रकरणात मोहम्मद शमी आणि ड्वेन ब्राव्होला फायदा झाला आहे. स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च फ्रँचायझी उचलते.

बीसीसीआयचा नियम काय?

भारतीय क्रिकेट बोर्डाने आपल्या करारबद्ध खेळाडूंच्या फायद्यासाठी विमा योजना लागू केली आहे. या अंतर्गत, जर एखादा खेळाडू केंद्रीय कराराचा भाग असेल आणि दुखापतीमुळे तो आयपीएलच्या कोणत्याही हंगामात खेळू शकत नसेल, तर त्याची रक्कम बीसीसीआयकडून दिली जाते.

दीपक चहरला होणार फायदा

दीपक चहरने मागील वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळी केल्यामुळे बीसीसीआयने त्याचा समावेश वार्षिक कराराच्या यादीत केला होता. गेल्या वर्षी बीसीसीआयत़ून ‘क’ श्रेणी अंतर्गत चहरचा करारात समावेश करण्यात आला होता. यामध्ये त्याला बोर्डाकडून वार्षिक एक कोटी रुपये मिळतात.


हेही वाचा : IPL 2022: गुजरात टायटन्सवर विजय मिळवण्यासाठी धोनी झाला फिरकीपटू, नेट प्रॅक्टिस करतानाचा Video व्हायरल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -