घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मध्ये कब्रस्तानच्या जागेसाठी खोदली स्वत:चीच कबर

नाशिक मध्ये कब्रस्तानच्या जागेसाठी खोदली स्वत:चीच कबर

Subscribe

२०१३ साली कब्रस्थानसाठी तीन एकर जागा

नवीन नाशिक : कब्रस्तानच्या जागेवरून मुस्लिम बांधव आक्रमक झाले असून नवीन नाशिकमध्ये स्वतःलाच कबरमध्ये गाडून घेत अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून नवीन नाशिक भागातील मुस्लिम बांधव कब्रस्तानला जागा मिळावी यासाठी मागणी करत आहेत. नाशिक जिल्हाधिकारयांना वेळोवेळी याबाबत निवेदन देण्यात आले मात्र या जागेचा विषय अद्याप मार्गी लागलेला नव्हता. दरम्यान, नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी पुन्हा जागेच्या पाहणीसाठी परिसरात आले होते. मात्र, पुन्हा मुस्लिम बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत कब्रस्तानच्या जागेच्या विषयावर आंदोलन सुरू केले. २०१३ साली महापालिकेच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी गौळाणेरोडवर कब्रस्थानसाठी तीन एकर जागा देण्यात आली आहे.

- Advertisement -

मात्र, यातील काही जागा शेतकर्‍याच्या ताब्यात आहे. ती जागा मिळावी म्हणून अजिज तांबोळी व नुरूद्यीन शेख यांनी कब्रस्थानमध्ये खड्डे खोदून स्वतःला अर्धवट बुजवून घेत आंदोलन केले. यावेळी विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील व भूमीअभिलेख विभागाचे अभियंता यांनी पाहणी केली. पालिका अधिकार्‍यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन चिघळल्याने अधिकार्‍यांनी काढता पाय घेतला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -