घरमहाराष्ट्रनाशिककोरोनात पतीच निधन, कर्जाचा बोजा वाढला; बँकेने काढली घराची जप्ती; विधवेची पालकमंत्र्यांकडे...

कोरोनात पतीच निधन, कर्जाचा बोजा वाढला; बँकेने काढली घराची जप्ती; विधवेची पालकमंत्र्यांकडे धाव

Subscribe

नाशिक : कोरोनामुळे पती गमावला, घरातील कर्ता पुरूष गेल्याने उदरनिर्वाह कसा चालवावा अशा विवंचनेत असताना आता बँकेने घर खाली करायला सांगितले. गृहकर्जाची परतफेड करू शकत नसल्याने बँकेकडून जप्तीची नोटीस पाठविण्यात आली. त्यामुळे यावर काहीतरी तोडगा काढून दिलासा द्यावा, अशी मागणी विधवा महिलांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. याबाबत बँकांशी चर्चा करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निर्देश देण्यात आले.

कोरोनामुळे अनेकांनी आपल्या घरातील कर्ता पुरूष गमावला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. कोरोनाच्या आधी अनेकांनी गृहकर्ज घेतले होते. मात्र, कोरोना संकट आले आणि त्यात पतीचा मृत्यू झाला. मात्र, आता वारसदार म्हणून त्यांच्या पत्नीकडे बँक अधिकारी गृहकर्ज हप्त्यासाठी तगादा लावत आहेत. ज्या कुटुंबात अशा दुर्दैवी घटना घडल्या, त्यातील अनेक महिलांना कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही.

- Advertisement -

काही महिला तुटपुंजी कमाई करत आहेत. त्यांची हप्ते भरण्याइतकी आर्थिक परिस्थिती नाही. मात्र, बँकांकडून या महिलांना घर जप्तीच्या नोटीसा पाठविण्यात आल्याने आता या महिलांचे संसार रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. यावर शासनाने काही तोडगा काढावा यासाठी २५ ते ३० महिलांनी पालकमंत्र्यांची भेट घेत चर्चा केली. यावर दादा भुसे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निर्देश देत बँकांनी सक्तीची वसुली न करण्याच्या सूचना केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -