घरमहाराष्ट्रनाशिकइंग्रजीच्या पेपरने फोडला घाम

इंग्रजीच्या पेपरने फोडला घाम

Subscribe

बारावी परीक्षा : एक लाख 63 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षम मंडळातर्फे शुक्रवार (दि.4) पासून इयत्ता बारावीची लेखी परीक्षेस सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एकही परीक्षार्थी कॉपी करताना आढळलेला नसला तरी पेपरने विद्यार्थ्यांना घाम फोडला. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय कमी झाल्याने परीक्षेसाठी अर्धा तास वाढीव वेळ विद्यार्थ्यांना मिळाला. नाशिक विभागातील एक लाख 63 हजार परीक्षार्थींनी पहिला पेपर सोडवला.कोरोनामुळे गेल्या वर्षी लेखी परीक्षा झालेली नव्हती. यंदा लेखी परीक्षेसाठी अर्धातास वेळ वाढवून देण्यात आला आहे.  सुधारित वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरु राहील. बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातून यंदा एक लाख 63 हजार 679 परीक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत.

नाशिक विभागात बारावीची 1070 महाविद्यालये असून त्यातील 248 महाविद्यालयांत नियमित परीक्षा केंद्र आहेत. तर 1015 उपकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करताना एक बँच सोडून विद्यार्थ्यांना बसवले होते. तसेच परीक्षागृहात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक होते. विद्यार्थ्यांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत परीक्षा दिली. विभागातील एकाही परीक्षा केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना आढळलेला नाही. परीक्षेत कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीतपणे पार पडला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -