घरमहाराष्ट्रनाशिकओबीसी आरक्षण लढाईत विघ्नहर्त्यांपेक्षा विघ्नकर्ते जास्त

ओबीसी आरक्षण लढाईत विघ्नहर्त्यांपेक्षा विघ्नकर्ते जास्त

Subscribe

पालकमंत्री भुजबळांची खंत; मंत्री भरणेंचा नागरी सत्कार

नाशिक : धनगर समाजासह ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. माळी समाज असेल किंवा धनगर समाजाने आपापसांतील पोटजाती विसरुन एकत्रपणे लढले तरच हे आरक्षण टिकेल, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. आरक्षणाच्या या लढाईत विघ्नहर्त्यांपेक्षा विघ्नकर्त्यांची संख्या जास्त असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुण्यश्लोक फाऊंडेशनतर्फे रविवारी (दि.20) महाकवी कालिदास कलामंदिरात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ‘नागरी सत्कार’ करण्यात आला.

 धनगर समाजाची ओळख असलेल्या घोंगडी, काठी आणि पिवळा फेटा प्रदान करत त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ होते. यावेळी भुजबळ म्हणाले, ओबीसी समाजात 430 जातींचा समावेश होतो. ओबीसींना मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. पोटजातींच्या नावाखाली एकमेंकांमध्येच लढत राहिलो तर मिळालेले आरक्षणही हातातून जाईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

समाजातीलच काही आम्हाला जमत नसेल तर राजीनामा देण्याची त्यांची भूमिका घेतात. परंतु, एक-एक नेता तयार होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. ही भावना समाजाने समजून घेवून एकत्रपणे लढल्यास ओबीसी समाजातूनच नेतृत्व तयार होतील, असेही ते म्हणाले. राज्यमंत्री भरणे यांनी नागरी सत्कारास उत्तर देताना म्हटले की, राजकारणात खोटं बोला पण रेटून बोलण्याची मला सवय नाही.

त्यामुळे समाजासाठी अगोदर काहीतरी करुन दाखवेण आणि मग सांगेन. समाजाचे कुठलेही प्रश्न किंवा अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी माजी आमदार हरिभाऊ भदे, प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्तु बोडके यांच्यासह मुख्य संयोजक धनंजय तानले, शिवाजी ढेपले, समाधान बागल आदी उपस्थित होते.

- Advertisement -

मल्हारराव होळकर पुरस्कार्थी

हभप तुकाराम महाराज जेऊरकर, विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे, उपजिल्हाधिकारी रोहन कुंवर, माजी उपजिल्हाधिकारी देविदास चौधरी, माजी नगरसेविका पूनम मोगरे, महेंद्र दुकळे, बाळासाहेब मूरडकर, डॉ. विजय थोरात, दत्तू देवकर, धनंजय वानले, विजय गाढे, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर पडळकर, ‘महापारेषण’चे मुख्य कार्यकारी अभियंता विनोद ढोरे यांचा युगपुरुष मल्हारराव होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -