घरताज्या घडामोडीBJP's Govt Formation: गोवा आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार? आज...

BJP’s Govt Formation: गोवा आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार? आज होणार फैसला

Subscribe

केंद्रीय पर्यवेक्षक, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एल मुरुगन आज, सोमवारी गोव्यात येणार आहेत. आज संध्याकाळी ४ वाजता प्रदेश भाजप कार्यालयात भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे.

गोवा आणि उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. आज दोन्ही राज्यातील नवनिर्वाचित भाजप आमदारांद्वारे आपापल्या विधीमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड केल्यानंतर मुख्यमंत्री पदाची घोषमा केली जाईल. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत हालचाल सुरू असताना काल, रविवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपचे महासचिव बी एल संतोष देखील उपस्थित होते.

गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तनवडे म्हणाले की, ‘केंद्रीय पर्यवेक्षक, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एल मुरुगन आज, सोमवारी गोव्यात येणार आहेत. आज संध्याकाळी ४ वाजता प्रदेश भाजप कार्यालयात भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. आमदारांचा गट ज्या नेत्याला निवडतील, तो सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपला पी एस श्रीधरन पिल्लई यांना संपर्क साधतील. मुख्यमंत्री शपथविधीचा सोहळा या आठवड्यात आयोजित करण्याची शक्यता आहे. केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीसाठी सोयीच्या तारखेवर अवलंबून आहे.’

- Advertisement -

प्रमोद सावंत पुन्हा एकदा होऊ शकतात मुख्यमंत्री

गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याचे संकेत पक्षातील काही नेत्यांनी दिले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने म्हटले की, ‘माजी मंत्री विश्वजीत राणे, ज्यांनी राज्यात भाजपची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तेही मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आहे.’ शनिवारी सावंत आणि राणे दोघेही केंद्रीय नेतृत्वासोबत बैठकीसाठी दिल्लीत गेले होते.

उत्तराखंडमधील आज परिस्थिती स्पष्ट होणार

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत अधिक अनिश्चितता दिसून आली. काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. पण भाजप बहुमताने विजयी झाले. रविवारी भाजप वरिष्ठ नेते आणि प्रमुख दावेदारांची दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीत जेपी नड्डा यांच्या व्यतिरिक्त पुष्कर सिंह धामी आणि राज्याचे वरिष्ठ नेते त्रिवेंद्र सिंह रावत, रमेश पोखरियाल निशंक आणि सतपाल महाराज उपस्थित होते. यानंतर उत्तराखंडचे भाजप प्रदेशाध्यक्ष मदत कौशिक आणि काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माध्यमांना सांगितले की, आज उत्तराखंडच्या भाजप आमदारांची बैठक होईल. त्यापूर्वी राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदार, विधानसभा सदस्यपदाची शपथ घेणार आहेत. भाजप आमदारांच्या बैठकीत उत्तराखंडच्या पुढील मुख्यमंत्रीचा निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – देशातील ‘या’ छोट्याशा राज्याने पेपरलेस विधानसभेच्या बाबतीत रचला इतिहास


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -