घरमहाराष्ट्रनाशिकसोन्यासारख्या दरांमुळे कांद्याचीही चोरी

सोन्यासारख्या दरांमुळे कांद्याचीही चोरी

Subscribe

साठवलेल्या कांद्यावर चोरट्यांचा डोळा, सटाणा-देवळा तालुक्यात आठवडाभरात ५ घटना

कांद्याला सोन्यासारखा भाव मिळत असल्यानं चोरट्यांनी आपला मोर्चा थेट कांदाचाळींकडे वळवला आहे. देवळ्यासह सटाणा तालुक्यात गेल्या आठवडाभरात पाच ठिकाणी कांदाचोरीच्या घटना घडल्या आहेत. वाजगाव आणि वाखारी गावातल्या कांदाचोरीच्या घटना ताज्या असतानाच रविवारी (दि. १) देवळा तालुक्यातल्या खामखेडा गावातल्या आबाजी शेवाळे या शेतकर्‍याचा ७ ते ८ क्विंटल कांदा चोरट्यांनी लंपास केला.

चांगल्या दराच्या अपेक्षेनं शेवाळे यांनी कांदा साठवला होता. अतिवृष्टी, निर्यातबंदी आणि आता चोरट्यांचं आव्हान कांदा उत्पादक शेतकर्‍यांपुढे उभं राहिलंय. या घटनांमुळे कांदा चाळींची राखण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागत असल्यानं, शेतकरी मात्र चांगलेच हैराण झालेत. शेवाळे यांनी खामखेडा गावातील कालव्यालगतच्या आपल्या चाळीत चांगल्या भावाच्या अपेक्षेने ६०० क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. त्यातील काही कांदा बाजारात विक्री केला होता. तर, उर्वरित १५० क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. परंतू, राञी चोरटयांनी शिल्लक कांद्यापैकी ७ ते ८ क्विंंटल कांदा चाळीतुन भरलेल्या पाट्यांसह चोरटयांनी लंपास केला. आबा शेवाळे यांचे वडील कारभारी शेवाळे दररोज रात्री कांदा राखण्यासाठी राहत होते. मात्र, ते येण्यापूर्वीच चोरट्यांनी कांद्यावर डल्ला मारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -