घरमहाराष्ट्रनाशिकशनिवारपासून ‘आरटीओ’त विमा प्रमाणपत्राची नोंदणी बंद

शनिवारपासून ‘आरटीओ’त विमा प्रमाणपत्राची नोंदणी बंद

Subscribe

वाहनधारकाद्वारे बनावट विमा प्रमाणपत्र सादर केल्यास संबंधितावर तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाणार - प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) शनिवारी (ता.१०) पासून वाहन ४.० या प्रणालीवर दिसून न येणारे असंगणकीकृत, हस्तलिखित विमा प्रमाणपत्र स्विकारले जाणार नाही. कोणत्याही विमा प्रमाणपत्राची नोंद संगणकावर केली जाणार नाही आणि कवरनोट स्विकारली जाणार नाही. वाहनधारकाद्वारे बनावट विमा प्रमाणपत्र सादर केल्यास संबंधितावर तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनधारकांतर्फे वाहनासंबंधित विमा प्रमाणपत्र सादर केले जातात. मात्र, सध्या सर्व विमा कंपन्यातर्फे ऑनलाईन विमाप्रमाणपत्र वितरित केले जात आहेत. त्या सर्व विमा प्रमाणपत्राची नोंदणी आरटीओ’च्या वाहन प्रणालीवर दिसून येत आहे, असे कळसकर यांनी संगितले.

- Advertisement -

याप्रकरणी नाशिक कार्यालयाच्या क्षेत्रातील विमा कंपन्याची २३ जुलै रोजी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत विमा कंपन्याच्या प्रतिनिधीनी त्यांचे सर्व नविन काढण्यात येणारे व जूने काढलेले विमा प्रमाणपत्रे संगणकीकृत झालेले आहे, असे सांगितले. त्यामुळे आरटीओ’त वाहन ४.० या प्रणालीवर दिसून न येणारे असंगणकीकृत, हस्तलिखित विमा प्रमाणपत्र स्विकारले जाणार नाही. बनावट विमा प्रमाणपत्रे आढळून आल्यास संबंधित वाहनचालकावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे गुन्हा दाखल केला जाणार आहे. बनावट विमा प्रमाणपत्रामुळे अपघातग्रस्त वाहनधारक व त्यांचा फायदा असणारे इतर घटक यांना फायदा मिळू शकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -