घरमहाराष्ट्रनाशिकसंभाजी स्टेडियमच्या प्रलंबित कामाची वर्कऑर्डर तातडीने काढा : आयुक्त

संभाजी स्टेडियमच्या प्रलंबित कामाची वर्कऑर्डर तातडीने काढा : आयुक्त

Subscribe

निविदाप्रक्रिया पूर्ण करून तात्काळ काम सुरू करण्याची सूचना

नाशिक : पालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि.२३) दुपारी नवीन नाशिकमधील राजे संभाजी स्टेडियमची पाहणी करत स्टेडियमच्या कामाची निविदा प्रकिया लवकरात लवकर पूर्ण करुन वर्कऑर्डर काढावी, असे आदेशही त्यांनी दिले.

‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत संभाजी स्टेडियमच्या विकासकामांना सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी सहा कोटींचा निधीही मंजूर झालेला आहे. मात्र, काम सुरू होऊनही ही कामे अर्धवट अवस्थेत बंद पडल्याने स्थानिक क्रीडापटू व नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. यासंदर्भात आपलं महानगरने गवतात हरवला संभाजी स्टेडियमचा विकास या मथळ्याखाली बातमीही प्रसिद्ध केली होती. यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी आयुक्तांना स्टेडियमच्या कामाबाबत माहिती दिली. कार्यकारी अभियंता सुनील रौंदळ, उपअभियंता हेमंत पेठे, शाखा अभियंता बालाजी सूर्यकर यावेळी उपस्थित होते. ‘खेलो इंडिया’ या उपक्रमाची आज व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक होती. त्यापूर्वी आयुक्तांनी स्टेडियमची पाहणी केली.

- Advertisement -

सहा कोटी मंजूर होऊनही दिरंगाई

’खेलो इंडिया खेलो अंतर्गत’ राजे संभाजी स्टेडियम येथे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून सहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महापालिकेनेदेखील कोट्यवधी रुपयांचा निधीचा वाटा देण्याचे ठरले होते. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला होता. मात्र, त्याप्रमाणे काम मात्र दिसून आले नाही. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सदर काम बंद अवस्थेत आहेत. या प्रकल्पाचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे दिसून आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेल्या या कामांमुळे नागरिकांना तसेच, क्रीडाप्रेमींना स्टेडियमचा पूर्णतः वापर करता येत नसल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -