घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलेखानगर : धर्मांतराचा डाव उधळला

लेखानगर : धर्मांतराचा डाव उधळला

Subscribe

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेखानगर परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जवळपास २०० ते ३०० हिंदू महिला व पुरुषांना एकत्र आणून त्यांना धर्मांतरासाठी वेगवेगळी आमिषे दाखवली जात असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही माहिती मिळताच शिंदे गटातील पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या माध्यमातून आयोजकांचा डाव हाणून पाडला.

धर्मांतर केल्यास कसे साक्षात्कार होतात, दुर्धर आजार कसे बरे होतात, असे भासवत उपस्थित हिंदूंना धर्मांतरासाठी प्रेरित केले जात होते. देशासह राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्वहिंदू परिषद यांसारखे राजकीय पक्ष व संघटना हिंदूंच्या संघटनासाठी सातत्याने प्रयत्नशील असताना नाशिक शहरात हिंदूंच्या धर्मांतराचा सुरू असलेला छुपा प्रकार धक्कादायक मानला जात आहे.

- Advertisement -

शहराच्या उच्चभ्रू आणि दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हिंदूंच्या धर्मांतरासाठी प्रत्येक रविवारी विशेष शिबिरांचे आयोजन केले जात होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अशाच एका शिबिरात काही विशिष्ट लोकांना स्टेजवर उभे करून त्यांना असलेले गंभीर आजार आणि त्यांनी धर्मांतर केल्यानंतर त्यांच्या धर्माच्या देवामुळे त्यांची त्या गंभीर आजारातून विनाऔषधे किंवा विनाशस्त्रक्रिया कशी सुटका झाली, हे उपस्थित महिला व पुरुषांना सांगितले जात होते. या संपूर्ण धर्मांतराच्या प्रक्रियेसाठी विशिष्ट समाजातील लोकांना तसेच, आर्थिक कमकुवत व अशिक्षितांना हेरून आर्थिक मदत, मोफत अन्नधान्य देण्याचे आश्वासन देत त्यांना या जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. धर्मांतराच्या घटना ग्रामीण भागात घडल्या आहेत. पण, आता असे प्रकार शहरी भागात सुरू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली असून, या प्रकरणात लवकरच धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करणार्‍यांचा शक्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

हिंदूंची संख्या कुठेतरी कमी करण्यासाठी काही धर्मविरोधी शक्ती कार्यरत आहेत. शहराच्या मध्यवर्ती लोकवस्तीत असे धर्मांतराचे प्रकार घडणे ही धक्कादायक बाब आहे. यापुढे शहरात धर्मांतराचे असे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित समाजकंटकांना जागेवरच योग्य ती समज देऊ. : लक्ष्मी ताठे, पदाधिकारी, शिंदे गट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -