घरमहाराष्ट्रनाशिकजनता विद्यालय व ज्यु. कॉलेजचा स्नेहमेळावा उत्साहात

जनता विद्यालय व ज्यु. कॉलेजचा स्नेहमेळावा उत्साहात

Subscribe

आठवणींच्या गावी.. आनंदाची पखरण..

नाशिक : कधीकाळी एकाच वाटेवरुन निघालेली पाऊलं आठवणींची शिदोरी घेऊन तब्बल दोन दशकांनंतर एकत्र येतात… मनसोक्त गप्पांमध्ये आनंदानुभूती घेतात… वर्गातल्या गमतीजमती, शिक्षकांचा मार, अल्लड वयातल्या खोड्या आणि अनुभवाअंती आलेले शहाणपण… अशा मनसोक्त गप्पांमध्ये हरवून जातात… माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने या सुवर्णक्षणांना उजाळा मिळाला.

जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (मेशी, ता. देवळा) येथील शाळा-कॉलेजातील माजी विद्यार्थ्यांनी गंगापूररोडवरील निसर्गरम्य ठिकाणी रविवारी (दि.२५) या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी उत्तर महाराष्ट्रासह मुंबई व गुजरात येथे स्थायिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. स्नेहमेळाव्याच्या प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. माजी विद्यार्थ्यांपैकी हभप ज्ञानेश्वर माऊली यांनी भारुड व गवळण सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. डोंगरगावचे ग्रामपंचायत सदस्य लालजी सावंत, तसेच अनिल कदम, पत्रकार भिला आहेर, प्रशांत सूर्यवंशी आदींनी मजेदार किस्से, आठवणी सांगितल्या. मोनाली बधान हिने कविता सादर केली.

- Advertisement -

यावेळी आप्पा सावंत, दादासाहेब निकम, राजेंद्र अहिरे, प्रशांत सूर्यवंशी, मधुकर बोरसे, हभप ज्ञानेश्वर माऊली, दादाजी देवरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विशाल सोनवणे, शोभा शिरसाठ, बायजा शिरसाठ मोनाली बधान, मनीषा अहिरे-पवार, भारती गुंजाळ, वैशाली शिरसाठ, अनिता शिरसाठ, दिलीप गांगुर्डे, केदा पगार, रवींद्र सावंत, किरण अहिरे, प्रभाकर अहिरे, रवींद्र बोरसे, गंगाधर बोरसे, प्रकाश संचेती, डॉ. नितीन पगार, बापू गरुड, सुनील कुंवर, अनिल कदम, लालजी सावंत, राजेंद्र बोरसे, सुरेश चव्हाण, साहेबराव पवार, भिला आहेर, सुरेश अहिरे उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीषा अहिरे-पवार यांनी केले. किरण अहिरे याने आभार मानले. मिष्ठान्न भोजनाचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा भेटण्याचा निश्चय करत विद्यार्थ्यानी निरोप घेतला.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -