घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक तालुक्यातील नानेगावात बिबट्या जेरबंद

नाशिक तालुक्यातील नानेगावात बिबट्या जेरबंद

Subscribe

नाशिक : देवळाली कॅम्प दोन दिवसांपूर्वी लहवित येथे पाच वर्षांची मादी जेरबंद झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी सायंकाळी पुन्हा नानेगाव येथे बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त
केले आहे.

काही दिवसांपासून नानेगाव परिसरात ऊसाच्या शेतात बिबट्या लपुन बसल्याचे शेतकर्यांनी बघितल्या नंतर पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली त्या नुसार वनविभागाच्या अधिकार्‍यांनी मनोहर बबन शिंदे यांच्या ऊसाच्या लगत पिंजरा लावला होता मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अलगद बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी बिबट्या ला बघण्यासाठी गर्दी केली होती शिंदे यांनी त्वरित वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे अनिल अहिरराव विजयसिंह पाटील आदींनी घटनास्थळी दाखल होऊन जेरबंद झालेल्या बिबट्याला नाशिक ला घेऊन गेले.

दारणा नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार असुन दारणा पंपिंग स्टेशन रोडला अनेकवेळा बिबट्याचा सामना झाला असुन याची भीती कायम आहे याची नोंद घेत वनविभागाने या भागात पिंजरा लावावा. : कार्तिक बलकवडे, नागरिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -