घरमहाराष्ट्रनाशिकLok Sabha 2024 : शांतिगिरी महाराज नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार?

Lok Sabha 2024 : शांतिगिरी महाराज नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार?

Subscribe

महायुतीकडून नाशिक लोकसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत चर्चेत असलेल्या नाशिक मतदारसंघात एक नवा ट्वीस्ट आला आहे. महायुतीकडून नाशिक लोकसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आपल्या अर्जासोबत शिवसेना शिंदे गटाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट झाला का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Lok Sabha Election 2024 Shantigiri Maharaj Shiv Sena candidate from Nashik)

महाराष्ट्रात दोन टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली असली तरी अद्यापही नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे अद्याप महायुतीकडून या जागेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच या जागेवर निवडणूक इच्छुक असल्याचे सांगिले होते. मात्र एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभेतून खासदार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा निवडणूक लढणार असल्याचे घोषित केल्यामुळे शांतिगिरी महाराज नाराज झाले होते. मात्र आता त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय जातींभोवती; नेत्यांकडूनही हीच रणनिती

शांतीगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. आज त्यांनी गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. शांतीगिरी महाराज यांनी एकूण चार अर्ज घेतले आहेत. याआधी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर आता त्यांनी दुसरा अर्ज भरला आहे. अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या पक्षाच्या नावापुढे शिवसेना शिंदेगटाचे नाव लिहिले आहे. मात्र त्यांनी अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नाही. त्यामुळे ते खरंच नाशिक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहे का? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

- Advertisement -

एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील (Eknath Shinde will take the right decision)

माध्यमांशी बोलताना शांतिगिरी महाराज म्हणाले की, एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून मी फॉर्म भरला आहे. मागच्या वेळेला आमचे निवडणुकीसंदर्भातील जे मुद्दे होते, ते एकनाथ शिंदे यांनी ऐकून घेतले होते आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र मी अद्यापही महायुतीचा उमेदवार नाही. आमच्या भक्तजणाने निर्णय घेतला आहे की, लोकसभा निवडणूक लढायची आणि जिंकायची. मात्र शिवसेना पक्षाने एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे लवकरच योग्य तो निर्णय घेतली, असा विश्वास शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Sanjay Raut : अजित पवार धमकीबहाद्दर, मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी; संजय राऊतांची टीका

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -