घरमहाराष्ट्रकोकणLok Sabha 2024 : उद्धव ठाकरे विकृत, तर राज ठाकरे...; नारायण राणेंची...

Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरे विकृत, तर राज ठाकरे…; नारायण राणेंची टीका

Subscribe

नारायण राणे यांनी राज ठाकरेंबाबत स्तुतीसुमनं बोलताना नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंना विकृत माणूस म्हटले आहे.

सिंधुदुर्ग : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ चर्चेत आहे. कारण याठिकाणी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत आणि महायुतीचे भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात लढत होत आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुनं शत्रूत्व आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणे यांनी राज ठाकरेंबाबत स्तुतीसुमनं बोलताना नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंना विकृत माणूस म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024 Raj Thackeray’s Attitude of Calling Good as Good Narayan Rane Uddhav Thackeray)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी शिर्के हायस्कूल मैदानावर सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना नारायण राणे म्हणाले की, मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीयत म्हणून त्यांची आठवण येत आहे. परंतु राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मनसेने माझ्यासाठी भव्य सभा आयोजित केली आहे. मनसेची सभा आणि उबाठा गटाची सभा हा योगायोग आहे. उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं. परंतु मनसे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मला मत म्हणजे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे, असे नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय जातींभोवती; नेत्यांकडूनही हीच रणनिती

राज ठाकरेंकडे चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृती आहे. मोदींनी जगाच्या अर्थ व्यवस्थेत भारताला पुढे आणलं आहे. मोदींची कामाची आणि निर्णय घेण्याची पद्धत देशाच्या हिताची आहे. ही सगळी धोरणं राज ठाकरेंना आवडली म्हणून त्यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा दिला. मनसैनिक आणि माझ्यात काही फरक मानत नाही. भविष्यात हाक मारली तर ओ दिल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांच्यासोबत माझे राजकारणापलिकडचे आहेत, असंही नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नारायण राणे म्हणाले की, बाजूच्या सभेत विचारवंत काय बोलतात यासाठी कार्यकर्ता पाठवला होता. मोदींवर टीका, शाहांवर टीका सुरू आहे. खोके खोके बोलता, नशीब मी मातोश्रीवर बोके सोडलेले नाहीत. माझ्या एवढं मातोश्री कोणाला माहित नाही. त्यामुळे वेळ आली तर सगळंच काढेन. पण मोदींवर बोललात तर रस्ते बंद करेन, असा इशारा देतानाच उद्धव ठाकरे विकृत माणूस आहे. त्यांना दुसऱ्याचं चांगलं पाहवत नाही. चाळीस वर्षे सोबत होतो. परंतु उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची लाज घालवली. GDP च्या प्रश्नावर उद्धव ठाकरे निरुत्तर झाले होते. कोकणात फक्त आग लावायला आले आहेत, काही द्यायला आलेले नाहीत. यांना दोन्ही जिल्ह्यातील गावं आणि तालुके माहित नाहीत, असा टोलाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

हेही वाचा – Sanjay Raut : अजित पवार धमकीबहाद्दर, मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी; संजय राऊतांची टीका

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -