घरमहाराष्ट्रनाशिकजादूटोण्याच्या संशयाने वृध्दाची हत्या

जादूटोण्याच्या संशयाने वृध्दाची हत्या

Subscribe

वृद्धाने केलेल्या जादूटोण्यामुळेच तब्येत खालावत असल्याच्या संशयाने एकाने वृद्धाची कुर्‍हाडीने सपासप वार करुन हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी येथे घडली. दिंडोरी पोलिसांनी हत्या करणार्‍यास अटक केली आहे. त्र्यंबक आबाजी टोंगारे (७३, रा.तिल्लोळी, ता.दिंडोरी) असे मृताचे नाव आहे. भास्कर रमेश बुरंगे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांच्या माहितीनुसार, त्र्यंबक टोंगारे यांनी भास्कर रमेश बुरंगे यांच्याकडे ४ वर्षांपूर्वी विहिरीसाठी जागा मागितली होती. मात्र, बुरंगे याने जागा देण्यास नकार दिला. त्यानंतर टोंगारे यांनी जादूटोणा केल्याने प्रकृती खालावत आहे, असा समज करत महिन्यांपूर्वी बुरंगेने टोंगारे यांच्याशी भांडण केले होते. त्र्यंबक टोंगारे हे मंगळवारी (दि.२४) सकाळी ११ वाजता शेतात जाण्यासाठी बैलजोडी आणि वखर घेवून नाळेगाव रस्त्याकडे जात होते. त्यावेळी बुरंगे याने पाठीमागून येत टोंगारे यांच्या डोक्यावर कुर्‍हाडीने सपासप वार केले. त्यात टोंगारे यांचा मृत्यू झाला. दिंडोरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -