घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा परिषदेचा यांत्रिकी उपविभाग व्हेंटिलेटरवर

जिल्हा परिषदेचा यांत्रिकी उपविभाग व्हेंटिलेटरवर

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेचा यांत्रिकी उपविभाग सध्या व्हेंटीलेटरवर असून या विभागाला भेट दिली असता विभागाची जर्जर अवस्था दिसून येते. दै. आपलं महानगरने या विभागाला भेट देत विभागाच्या जर्जर अवस्थेवर प्रकाशझोत टाकला. एन. डी. पटेलरोडच्या कॉर्नरवर जिल्हा परिषदेचा उपअभियंता (यां.) यांत्रिकी उपविभाग कार्यरत आहे. या विभागात 1 उपअभियंता आणि 4 ते 5 कर्मचारी कार्यरत आहे.

मात्र, याठिकाणी कर्मचार्‍यांना बसण्यासाठी टाकण्यात आलेले टेबल, कपाटे आणि कपाटांमागील भंगारावस्थेत पडलेले सामान, छपराला प्लॅस्टिक टाकून पाणी येऊ नये यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न, तुटलेल्या अवस्थेतील लोखंडी जाळीचे गेट हे सर्व बघितले असता आपण एखाद्या जुन्यापुरान्या जीर्ण अवस्थेतील इमारतीत आलो आहोत की यांत्रिकी विभागात असा प्रश्न पडतो. जिल्हा परिषद प्रशासनाने या विभागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कित्येक वर्षापासून या विभागातील कर्मचारी जर्जर झालेल्या इमारतीतच काम करत असल्याचे स्पष्ट होते. पावसाळ्यात तर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. या काळात या कर्मचार्‍यांना काम करणेही मुश्किल होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अभियंता आशिमा मित्तल यांनी एकदा भेट देऊन पाहणी करावी, प्रशासनाने विभागाला जिल्हा परिषदेतच्या मुख्यालयात जागा द्यावी किंवा इतरत्र कुठेही जागा द्यावी अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

एकीकडे उजेड, दुसरीकडे अंधार

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाचे रुपडे पालटण्यासाठी प्रशासनाने 47 लाख रुपये मंजूर केले आहे. युध्द पातळीवर मुख्यालयाची रंगरंगोटी सुरु आहे, नाशिक पंचायत समितीची इमारतही दिमाखात उभी आहे. मात्र दुसरीकडे मुख्यालयाव्यतिरिक्त इतरत्र असेलेली जिल्हा परिषदेची कार्यालये जर्जर अवस्थेत सुरु आहेत याकडे प्रशासनचे दुर्लक्ष होत आहे. या विभागांची अवस्था सुधारण्यासाठीही प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -