घरमहाराष्ट्रनाशिकसप्तश्रृंगीगडावर प्लास्टीक वापरल्यास कारवाई

सप्तश्रृंगीगडावर प्लास्टीक वापरल्यास कारवाई

Subscribe

ग्रामपंचायतीकडून व्यावसायिकांना सहकार्याचे आवाहन

सप्तश्रृंगीगडावर प्लास्टीकबंदी केलेली आहे. जे व्यावसायिक अजूनही प्लास्टीक वापरतात, त्यांनी प्लास्टीक पिशव्या तात्काळ बंद केले नाही तर, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून दंडात्मक कारवाई आणि व्यवसाय परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गड प्लास्टीकमुक्त करण्यासाठी सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतीला व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, ग्रामसेवक आर.बी. जाधव यांनी केले आहे. कळवण सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेत प्रांत कार्यालयात ग्रामपंचायत पदाधिकारी, सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक आदींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 100 टक्के प्लास्टीक मुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. गडावर त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी जनजागृती करीत तसेच जे व्यावसायिक प्लास्टीकचा वापर करीत असतील त्यांना दंड करण्यात येईल, असे सांगत मोहीम राबविली. व्यावसायिकांना ही शेवटची संधी असल्याने दूकानदारांनी प्लास्टीक वापरणे बंद करावे, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य गिरीष गवळी, जगन बर्डे, हसंराज बर्डे, ललिता व्हरर्गळ, मेघा बर्डे, जयश्री गायकवाड, ग्रामसेवक आर.बी.जाधव यांनी केले.

- Advertisement -

गडावर सध्या पावसाचा जोर असल्याने पूजाविधीसाठी लागणारे साहित्य ओले होते. दूकानदारांनी हे साहित्य 40 मायक्रोनपेक्षा जाडीच्या प्लास्टीक पिशवीत ठेवावे, तसेच ज्या व्यावसायिकांचे साहित्य कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांमध्ये असेल, त्यांना प्रशासनाने पावसाळा संपेपर्यत सवलत द्यावी, कारण प्लास्टीक आवरण काढून टाकले तर देवीचा प्रसाद, खोळ भरण्यासाठी लागणार्‍या साड्या खराब होती. – राजेश गवळी, उपसरपंच सप्तश्रृंगीगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -