घरमहाराष्ट्रनाशिकसैनिकी सेवा वर्षभरात संपणार होती, मात्र त्याआधीच असे काही झाले की जवान...

सैनिकी सेवा वर्षभरात संपणार होती, मात्र त्याआधीच असे काही झाले की जवान रतन गुळे झाले अनंतात विलीन

Subscribe

नाशिक : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलातील जवान रतन राजाराम गुळे यांचा मुंबई येथे अश्विनी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. रतन गुळे यांच्या निधनामुळे जळगाव नेऊर गावावर शोककळा पसरली असून, शुक्रवारी सकाळी १२ वाजता रतन गुळे यांच्यावर त्यांच्या वस्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जळगाव नेऊर हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील जवळपास पन्नास च्या आसपास जवान सैन्य दलात असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रतन गुळे २६ नोव्हेंबर २००७ मध्ये मुंबई, ठाणे येथे भारतीय सैन्य दलात भरती झाले, आर्टिलरी सेंटर हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जम्मू-काश्मीर राजौरी सेक्टर, ५६ राष्ट्रीय रायफल मच्छल सेक्टर कुपवाडा, लेहतक, राजस्थान जोतपूर, नाशिक आदी ठिकाणी कर्तव्य बजावले असून नाशिक येथील युनिटमध्ये कार्यरत असताना दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने मुंबई येथे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात शेतकरी वडील राजाराम, पत्नी सुनीता, भाऊ गोरख व सुनील असा परिवार आहे. यावेळी तहसीलदार आबा महाजन, बाजार समितीचे अध्यक्ष किसनराव धनगे, शिवसेना नेते संभाजी राजे पवार, माजी सभापती संजय बनकर, वसंतराव पवार, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, बापूसाहेब गायकवाड, सरपंच अनिता कुर्‍हाडे, माजी सभापती प्रकाश वाघ, भाऊसाहेब चव्हाणके व मोठ्या प्रमाणात आजी-माजी सैनिक उपस्थित होते.

- Advertisement -

२६ नोव्हेंबर २००७ मध्ये ठाणे येथे भरती झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टर, कुपवाडा या कठीण ठिकाणी आपले कर्तव्य बजावले, जळगाव नेऊर येथील जनता विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतले, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत असताना २००७ मध्ये भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न साकार झाले, त्यांच्या सेवेचा कालावधी वर्ष-दीड वर्षाच राहिलेला होता. येवला तालुक्यातील आंबेगाव येथील बाळकृष्ण काळे यांच्या सुनीता या मुलीशी २०११ मध्ये विवाह झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -