घरमहाराष्ट्रनाशिकदगडधोंडे तुडवत निवृत्तीनाथ महाराज पालखीची वाटचाल; सिन्नर-संगमनेर सरहद्दीवरील रस्त्यांच्या दुरावस्थेचा फटका

दगडधोंडे तुडवत निवृत्तीनाथ महाराज पालखीची वाटचाल; सिन्नर-संगमनेर सरहद्दीवरील रस्त्यांच्या दुरावस्थेचा फटका

Subscribe

नाशिक : पारेगावचा मुक्काम आटोपून पालखी सकाळी ७.३० वाजता काकडवाडी मार्गे तळेगाव, वडझरी लव्हारे कासारे मार्गे ६ वाजता गोगलगाव मुक्कामी पोहोचली. काकडवाडी वडझरी येथे मोठ्या प्रमाणात रस्ता खराब असल्यामुळे वारकर्‍यांच्या पायाला ठेचा लागत होत्या परंतु विठ्ठल भेटीची आस सर्व वेदनांवर फुंकर घालत होती असे ते दृश्य दिसत होते… उन्हाचा प्रचंड तडाका असल्यामुळे जीव पाणी पाणी करत होता.

वारकर्‍यांनी उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून आपल्या गांधी टोपीच्या खाली कडुलिंबाचा पाला ठेवला होता. यावेळी दिंडीत सामील असलेले देवरगाव नाशिक येथील वारकरी सुखदेव खाडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की लिंबाचा पाला हा थंड असतो त्यामुळे ऊन लागले तरी ते बांधत नाही त्यामुळे आम्ही टोपीच्या खाली कडुलिंबाचा पाला ठेवतो. दगड धोंड्याच्या रस्त्यामुळे पालखी रथाचे साध्य करणारे बैलांना देखील देखील मोठ्या प्रमाणात कसंरत करावी लागत होती.
बैलांना त्रास होऊ नये म्हणून वारकरी रथाला पाठीमागून लोटत होते.

- Advertisement -

प्रचंड ऊन असून देखील वारकर्‍यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले वारकरी पालखी गोगलगाव मध्ये येताच आनंदाने जय जय राम कृष्ण हरीचा गजर करत नाचत होते. प्रशासनाने पाण्याचे टँकरची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केल्यामुळे यंदा पालखी सोहळ्यात आणि टंचाई जाणवली नाही. परंतु रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ज्येष्ठ वारकर्‍यांनी देखील नाराजी व्यक्त केली सिन्नर तालुका व संगमनेर तालुका सर हद्दीवरील रस्त्याची दुरावस्था वारकर्‍यांना त्रासदायक ठरत आहे जिल्हा प्रशासनाने नियोजन आराखड्यात संत निवृत्तीनाथ महाराज पालखी जाणार्‍या मार्गाची दुरुस्ती करून वारकर्‍यांची वाट सुखकर करावी अशी मागणी वारकर्‍यांनी केली यावेळी आहे.

दरम्यान पालखी सोहळा विसावल्यावर विसावल्यानंतर हभप बनाजी महाराज वाकचौरे यांचे हरिकीर्तन झाले. त्यानंतर गावकर्‍यांनी दिंडी सोहळ्यातील भाविकांना जेवणाची पंगत दिली. यंदा तरुणांचा देखील पालखी सोहळ्यात मोठा समावेश आहे. गोगलगाव ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच देवराम मगर पाटील, पोलीस पाटील भाऊसाहेब खाडे, यांच्यासह रामप्रसाद मगर, बाळासाहेब शिंदे कारभारी कांदळकर यांनी पालखीचे स्वागत केले. उद्या पालखी लोणी बाबळेश्वर मार्गे राजुरी येथे मुक्कामी जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -