घरमहाराष्ट्रनाशिकजोशी समाज संघटनेचा निफाड तहसिलवर मोर्चा

जोशी समाज संघटनेचा निफाड तहसिलवर मोर्चा

Subscribe

महाराष्ट्रभर जोशी समाज संघटनेने आंदोलन सुरू

नाशिक : साक्री नगरपंचायत निवडणूक मतमोजणीनंतर झालेल्या हाणामारीत मोहिनी जाधव हिचा मृत्यू झाला. जोशी समाजाने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी निफाड तहसीलदार कार्यालय व पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढून संबंधित अधिकार्‍यांना निवेदन सादर केले.

निवेदनात जातीवादक राजकारण पेटले व कमी जातीच्या लोकांनी राजकारणात पडू नये व जातीवाचक शिवीगाळ केली. भटक्या जोशी समाजाच्या महिला मोहिनी नितीन जाधव हिला तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या 30 ते 40 लोकांनी तिला भर रस्त्यात मारले, त्यात तिचा मृत्यू झाला. मागील 6 दिवसांत आरोपी मोकाट फिरत असल्याने आरोपीवर कारवाई व्हावी असे निवेदनात म्हटले आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर जोशी समाज संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी (दि.27) निफाड तहसील कार्यालयावर निफाड तालुका जोशी समाज युवकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चाला निफाड तालुक्यातील जोशी समाज बांधव मोठ्या संख्येने एकवटले होते.

- Advertisement -

निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, पोलीस निरीक्षक आर.बी. सानप यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, जोशी समाजाच्या मोहिनी जाधव या महिलेच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी जोशी समाज संघटनेचे राजेंद्र हरगावकर, सोमनाथ धुमाळ, नाना शिंदे, दीपक हरगावकर, आकाश हरगावकर, संदीप धुमाळ, रघुनाथ धुमाळ, अशोक ससाणे, गोकुळ धुमाळ, राजेंद्र धुमाळ, देविदास शिंदे, दीपक जाधव, संजय धुमाळ, सागर शिंदे, प्रवीण गरड, संतोष धुमाळ, शाम ससाणे, प्रकाश करे कर, किशोर हरगावकर, विलास धुमाळ, संतोष शिंदे, गोरख हरगावकर, संतोष करेकर, जोशी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -