ICC U-19 World Cup: भारत-पाकमध्ये होणार नाही महामुकाबला , कांगारूंकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग

ऑस्ट्रेलियाने अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल (शुक्रवार) ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानचा ११९ धावांनी पराभव केला. त्यामुळे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील आज(शनिवार) होणाऱ्या सामन्यातील विजेत्या संघाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा पराभूत केल्यामुळे पाक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून चाहत्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाचा पाकिस्तानने पराभव केला असता तर उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाने धडक मारली असती. दुसरीकडे टीम इंडियाने बांगलादेशवर विजय मिळवला तर टीम इंडिया उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.

ऑस्ट्रेलियाने पाकला दिलं २७६ धावांचं आव्हान 

ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने २७६ धावांचं आव्हान पाकला दिलं होतं. तसेच पाकने ऑस्ट्रेलियाचे सात विकेट्स घेतले होते. सलामीवीर टीग वायलीने ७१ आणि कोरी मिलरने ६४ धावा केल्या. तसेच या दोन फलंदाजांनी १०१ धावांची भागीदारी केली होती. दुसरीकडे आव्हान पूर्ण करण्यासाठी पाक संघ मैदानात उतरला असता संपूर्ण संघ १५७ धावांवर गारद झाला. मेहरान मुमताजने २९ धावा केल्या. तर अब्दुल फसीहने २८ धावा केल्या होत्या.

दरम्यान, टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आज मुकाबला होणार असून टीम इंडिया उपांत्य फेरीत धडक मारणार का, हे पाहणं क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : संयुक्त किसान मोर्चा ३१ जानेवारीला साजरा करणार ‘विश्वासघात दिवस’; जिल्हास्तरावर होणार आंदोलन