घरक्राइमउन्हाळ्यात टायर फुटण्याचे प्रमाण अधिक; प्रवासापूर्वी हवा तपासा

उन्हाळ्यात टायर फुटण्याचे प्रमाण अधिक; प्रवासापूर्वी हवा तपासा

Subscribe

उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हात कारचे टायर फाटण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अपघातांच्या घटनांवरून समोर आले आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, कारच्या टायरमधील हवा वाढत आहे. अतिउष्णतेमुळे टायर फुटून अपघात घडत असल्यामुळे उन्हामध्ये प्रवासाला निघण्यापूर्वी वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच, टायरच्या हवेची तपासणी करावी. त्यानंतर वाहतूक नियमांचे पालन करत चालकांनी वाहने चालवावीत, असे आवाहन पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी केले आहे.

उन्हाळ्यात टायर फुटण्यामागील पहिले कारण म्हणजे टायर फार जुने असणे. कारच्या इतर भागांप्रमाणे, टायर हा देखील एक भाग आहे, ज्याचा वापर करण्यासाठी वेळ मर्यादा आहे. त्यामुळे वाहनाचे टायर वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे.
वाहनात कुठेही जाण्यापूर्वी हवेचा घनता तपासणी करणे गरजेचे आहे. प्रवासात चाकांचा दाब वाढू लागतो. अशा परिस्थितीत जर हवा पूर्वीपेक्षा जास्त असेल तर टायर फुटण्याची शक्यता असते. काहीवेळा वाहन चालवताना निष्काळजीपणा केल्यास टायर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे रॅश किंवा झिगझॅग पद्धतीने चुकीचे वाहन चालवणे टाळावे, जेणेकरून टायर फुटण्यासारखी परिस्थिती टाळता येईल.

- Advertisement -

प्रवासाला निघताना वाहनांच्या टायरची अवस्था योग्य असणे गरजेचे आहे. टायरची कालमर्यादा व टायरमधील हवेची घनता तपासावी. उन्हाळ्यात टायरमध्ये नायट्रोजन हवा भरावी.
– प्रशांत देशमुख , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

अशी घ्या काळजी

  • जुने टायर कालांतराने कमकुवत होतात. यामध्ये हवेचा उच्च दाब सहन करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे वाहनाचे टायर जुने तात्काळ बदलावेत.
  • कडाक्याच्या उन्हामध्ये प्रवास करणे टाळा. सतत वाहन चालवल्यामुळे टायर गरम होतात आणि उन्हामुळे रस्ताही गरम होतो, त्यामुळे टायर खराब होऊ शकतात.
  • वाहनातील ऑईलची पातळी अन् त्याचे आयुर्मान हे तपासणे महत्त्वाचे आहे.
  • ब्रेकपॅडची तपासणी करून आवश्यकता असल्यास तत्काळ बदली करून घ्यावे.
  • बॅटरीच्या वायरिंगची तपासणी करा.
  • उन्हाळ्यात पेट्रोल टाकी पूर्ण भरू नका.
  • पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजीचा वाहनात वास येत असल्यास वाहन बाजूला घेऊन तपासा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -