घरमहाराष्ट्रनाशिकअकरा कोटी थकबाकी, महावितरणची कारवाई

अकरा कोटी थकबाकी, महावितरणची कारवाई

Subscribe

पथदीप, पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित

कळवण तालुक्यातील पथदीप वीज जोडणी संख्या २०१ असून एकूण थकबाकी ११.१८ कोटी आहे. महावितरण कंपनीच्या थकबाकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने, सर्व वर्गवारीच्या वीज ग्राहक यांच्या थकबाकी वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये ५ पथदीप वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील बराचसा भाग अंधारात असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सदरची थकबाकी किंवा वीज बिल हे जिल्हा परिषदेच्या स्तरावरून अदा केले जात होते. ग्रामपंचायतींच्या या बीलांची पथदिपांची थकबाकी ११.१८ कोटींवर पोहोचली असून, गेल्या वर्षीपासून देयका पोटी भरणा झाला नाही. तसेच पाणीपुरवठा योजना वीज बिलांचा एकूण ३.२३ कोटी थकबाकीचा असून ग्रामपंचायतकडून बिल भरणा नियमित नसल्याने थकबाकी वाढत आहे. कळवण तालुक्यातील पाणीपुरवठा जोडणी संख्या एकूण १०६ आहे. थकबाकीमुळे तालुक्यातील देसराणे, रवळजी, कनाशी, वाडी बुद्रुक, वाडीखुर्द या गावांचे पथदिपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला व पाणी पुरवठा विहिरींचा अभोणा (दोन), कनाशी (दोन), सप्तशृंगगड (एक) , ओतुर (एक) असा विज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुरळीत विज पुरवठ्यासाठी वीज देयके नियमित अदा करण्याचे आवाहन महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. या मोहिमेत कळवणचे कार्यकारी अभियंता अतुल गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता नितीन आंबडकर, सर्व कक्षप्रमुख व अधिकारी, कर्मचारी यांनी सदर मोहिमेत सहभाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -