घरमहाराष्ट्रनाशिकनिरुपयोगी पानवेलींपासून बहुपयोगी वस्तू; जिल्हा परिषदेची अनोखी संकल्पना

निरुपयोगी पानवेलींपासून बहुपयोगी वस्तू; जिल्हा परिषदेची अनोखी संकल्पना

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून पानवेलींपासून विविध घरगुती उपयोगाच्या वस्तू बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या १० दिवसीय कार्यशाळेत 35 महिलांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. पश्चिम बंगालस्थित नीवजीवन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून चांदोरी येथील ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये ही कार्यशाळा सुरू आहे.

घरगुती वापराच्या तसेच, महिलांना उपयुक्त अशा बास्केट, टोकरी, टी कोस्टर, पर्स विविध वस्तू या कार्यशाळेत बनविण्यात येत आहेत. प्रशिक्षणासाठी उपयोगात येणारा कच्चा माल म्हणून वाळलेल्या पानवेलींचा वापर होत येत असून, प्रारंभी प्रशिक्षणासाठी या पानवेली आसाम राज्यातून मागविण्यात आल्या आहेत. चांदोरी येथील गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर पानवेली आल्या आहेत. गोदावरीचा श्वास कोंडला जात असल्याने गोदापात्राला पानवेलींपासून मुक्त करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने या पानवेली नदीपात्रातून बाहेर काढण्यात येत आहेत.

- Advertisement -

या पानवेलींपासून बायप्रॉडक्ट बनविण्याची कल्पना नीवजीवन या स्वयंसेवी संस्थेचे संचालक प्रोतिक कुंडू यांना सूचली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांच्याशी बहुपयोगी अशा वस्तू बनविण्याबाबत चर्चा केली. यानंतर 1 ऑगस्टपासून चांदोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या हॉलमध्ये १० दिवसीय महिलांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले.
पानवेलींपासून घरगुती वापराच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण 35 महिलांना दिल्यावर या महिला त्यांच्या गावात जाऊन प्रत्येकी 30 महिलांना प्रशिक्षण देणार आहे. यानंतर या वस्तुंचे मार्केटिंग शासकीय महोत्सव, मॉल्स, क्राफ्ट बाजार, हॅण्डमेड प्रॉडक्ट सेल या ठिकाणी तसेच, ऑनलाईन शॉपिंगद्वारे करण्यात येणार आहे. महिलांनी बनविलेल्या वस्तुंची किंमत प्रत्येकी 150 ते 250 रुपये ठेवण्यात आली असून, सर्व वस्तु या इको फ्रेंडली बनविण्यात आल्या आहेत.

अशी आहे प्रक्रिया 

नदीपात्रातून पानवेली बाहेर काढल्यानंतर त्याचा मुळाकडचा आणि पानाकडचा भाग काढून टाकण्यात येतो. त्यानंतर या पानवेलींच्या शाखा 10 ते 15 दिवस वाळविण्यात येतात. पानवेली पूर्ण वाळल्यानंतर त्या मशीनमध्ये घालून सरळ करण्यात येतात. थर्मोकॉलपासून वस्तुंचा साचा तयार करुन त्याभोवती पानवेली गुंफण्यात येतात. वस्तुची निर्मिती झाल्यानंतर साचा काढून टाकण्यात येतो. त्यानंतर वस्तुला कलर देऊन अंतिम उत्पादन बनविण्यात येते.

चांदोरी येथील गोदावरीच्या नदीपात्रात पानवेली वाढत असल्याने त्या काढून टाकण्यात येत आहेत. या काढून टाकलेल्या पानवेलींपासून घरगुती वापराच्या वस्तू बनविण्याची कल्पना पश्चिम बंगालच्या नीवजीवन स्वयंसेवी संस्थेचे संचालक प्रोतिक कुंडू यांना सूचली. त्यांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. : आशिमा मित्तल, सीईओ, जिल्हा परिषद, नाशिक

नीवजीवन स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आसाम येथील ब्रह्मपुत्रा नदीतील पानवेलींपासून वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण 35 महिलांना देण्यात येत आहे. शुक्रवारी प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस आहे. सर्व महिला वस्तू बनविण्यात मास्टर ट्रेनर झाल्या आहेत. या कार्यशाळेनंतर महिलांचा स्वयंरोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. : प्रोतीक कुंंडू, संचालक, नीवजीवन, पश्चिम बंगाल

चांदोरीसह खेरवाडी, सायखेडा, गोंडेगाव, चाटोरी, शिंगवे आणि करंजगाव या 7 गावांतील सुमारे 35 महिलांना पानवेलींपासून घरगुती वापराच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या महिला मास्टर ट्रेनर झाल्यानंतर त्या त्यांच्या गावात जाऊन इतर महिलांना प्रशिक्षण देतील. यामुळे वस्तू बनविण्याची कार्यक्षमता वाढणार आहे. : विनायक खरात, सरपंच, चांदोरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -