Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश विरोधी पक्षांच्या 'INDIA' नावाला आव्हान; मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी नकार

विरोधी पक्षांच्या ‘INDIA’ नावाला आव्हान; मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी नकार

Subscribe

नवी दिल्ली : सत्ताधारी पक्षाच्या ‘NDA’ आघाडीला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षाने त्यांच्या आघाडीचे नाव ‘INDIA’ असे ठेवले. पण याच नावाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. (Challenge to opposition parties INDIA name But the Supreme Court denied hearing)

‘INDIA’ आघाडीच्या नावावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही राजकीय पक्षांना नैतिकता सांगण्यासाठी याठिकाणी बसलेलो नाही. ही याचिका म्हणजे न्यायालयीन वेळेचा अपव्यय आहे. आम्हाला या प्रकरणात ढवळाढवळ करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही किंवा त्यात लोकहिताचे कोणतेही कारण दिसत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Manipur voilence : पोलिसांच्या संगनमताच्या आरोपांची चौकशी करा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचे नाव ‘INDIA’ ठेवल्यामुळे वकील रोहित खेरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. रोहित खेरीवाल यांनी न्यायालयात म्हटले की, अशाच एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि निवडणूक आयोगाला आधीच नोटीस बजावली आहे. तसेच खेरीवाल यांनी आपल्या याचिकेत निवडणूक आयोग, भारतीय प्रेस कौन्सिल, भारतातील काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना पक्षकार बनवले होते. याशिवाय त्यांनी सूचना केल्या होत्या की, सर्व विरोधी पक्षांना ‘INDIA’ नाव वापरण्यापासून थांबवावे आणि माध्यमांनीही ‘INDIA’ नाव वापरू नये.

- Advertisement -

हेही वाचा – Independence Day:स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मेड इन इंडियाचे हेलिकॉप्टर करणार पुष्पवृष्टी

विरोधकांच्या आघाडीला ‘INDIA’ नाव कसे पडले?

दरम्यान, भाजपाला सत्तेवरून हटवण्यासाठी आणि 2024च्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा विरोधकांच्या एकजुटीने एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. या बैठकीला 15 विरोध पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै रोजी बंगळुरूमध्ये बोलावण्यात आली होती. या बैठकीत 25 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत विरोधकांच्या या नव्या आघाडीचे नाव ‘INDIA’ ठेवण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत मांडला. सर्व पक्षांनी याला अनुमोदन दिले आणि ‘INDIA’ या नावाखालीच आगामी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार करण्यात आला.

I – Indian (इंडियन)
N – National (नॅशनल)
D – Developmental (डेव्हलपमेन्टल)
I – Inclusive (इन्क्लुझिव्ह)
A – Alliance (अलायन्स)

असा या आघाडीच्या नावाचा फुलफॉर्म आहे.

- Advertisment -