घरमहाराष्ट्रनाशिकमविप्र : संचालक खातळे यांच्या हायट्रिकला गुळवे ब्रेक लावनार ?

मविप्र : संचालक खातळे यांच्या हायट्रिकला गुळवे ब्रेक लावनार ?

Subscribe

नाशिक : शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर समजल्या जाणा-या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज माघारी नंतर स्पष्ठ झाले असुन आता ख-या अर्थाने निवडणूक फड़ रंगात आला आहे.इगतपुरी तालुक्यात संचालक पदासाठी सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेले विद्यमान संचालक भाऊसाहेब खातळे हे सरचिटणीस निलिमा पवार यांच्या सत्ताधारी प्रगती पैनल कडून तीस-यांदा तर विरोधी गटाचे अड़ नितिन ठाकरे यांच्या परिवर्तन पैनल कडून माजी संचालक स्व गोपाळराव गुळवे यांचे सुपुत्र अड़ संदीप गुळवे यांच्यात अस्तित्वाची लढाई होत आहे. दोन्हीही पैनल कडून जिल्हाभर आरोप,प्रत्यारोप केले जात असल्याचे बघायला मिळत असल्याने यावेळची निवडणूक अत्यंत चुरशिचि होण्याची शक्यता असुन येत्या २८ ऑगस्ट ला सुमारे १० हजार सभासद याचा फैसला करणार आहेत.

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जिल्ह्यात १० हजार १४७ अजीव सभासद मतदार आहेत. यापैकी इगतपुरी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे १४२ सभासद मतदार आहेत. त्यापैकी अलीकडे काही मयत देखील झालेले आहेत. जिल्ह्यातील निफाड़, कळवण, देवळा,सटाणा,चांदवड आदि तालुक्यात सभासदांची संख्या जास्त असल्याने साहजिकच संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीत या तालुकयांची भूमिका कायम निर्णायक ठरते. सबंध जिल्ह्यातील सभासदांना सर्व जागांवर मतदनाचा अधिकार प्राप्त असल्याने ’पैनल टु पैनल’ मतदनाला फार महत्व प्राप्त झालेले आहे.असे असले तरि व्यक्तिगत नाते सबंध बघून ही मतदान केले जात असतेच.

- Advertisement -

मविप्र संस्थेच्या निवडणुकांचा इगतपुरी तालुक्यापुरता इतिहास जर मागे वळून बघितला तर १९८२ साली दिवंगत जेष्ठ नेते गोपाळराव गुळवे यांना या संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली होती. १९८७ मध्ये घोटी येथील रामचंद्र पाटील जाधव तर 1992 मध्ये कांचनगावचे अड़ बी एम गव्हाणे संस्थेवर निवडले गेले होते. १९९७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत स्व डॉ दौलतराव आहेर गटाच्या पैनल मधुन तालुक्यातील जेष्ठ नेते नांदगाव बु येथील वसंतराव मुसळे यांनी पहिल्यांदा निवडणुक लढविली आणि त्यात ते मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यावेळी त्यांनी विद्यमान संचालक अड़ गव्हाणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २००२ ते २०१२ अशी सलग दहा वर्षे सांजेगाव येथील अड़ बाबूराव गोवर्धने संस्थेवर संचालक म्हणून काम केले. त्यांची हायट्रिक २०१२ मध्ये भाऊसाहेब खातळे यांनी मोडित काढली. खातळे हे गेल्या सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत (२०१२ आणि २०१७) संचालक म्हणून सत्ताधारी प्रगती पैनल कडून निवडून आलेले आहे. विशेष म्हणजे स्व गोवर्धने यांनी सलग तीन वेळा निवडणूक लढविली मात्र त्यांना हायट्रिक करता आली नाही तर या निवडणुकीत ही विद्यमान संचालक भाऊसाहेब खातळे तीस-यंदा निवडणुकीस उभे असुन ते यावेळी हायट्रिक करणार की गुळवे त्यांना ब्रेक लावून मविप्र त पदार्पण करणार हे निवडणुकीच्या निकाला नंतर स्पष्ठ होईलच. मात्र एक अस्तित्वाची लढाई या निमित्ताने निवडणुकीत दिसत आहे.

२००७ च्या निवडणुकी पर्यंत दिवंगत जेष्ठ नेते गोपाळराव गुळवे हे निवडनुकीची सुत्रे फिरवत असत. १९८२ च्या पूर्वीच्या बहुतेक निवडणुका बिनविरोध पार पड़ल्या आहेत. यावेळी कर्मवीर स्व विट्ठलराव हांडे यांचे जावई आणि तालुक्यातील जेष्ठ सभासद दामोदर पागेरे तसेच बाळासाहेब कुकडे, संपतराव मुसळे आदि सह काही इतर सभासदांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अड़ नितिन ठाकरे यांच्या परिवर्तन पैनल कडून पागेरे,मुसळे यांची नावे चर्चेत होती. कर्मवीर स्व विट्ठलराव हांडे यांचे जावई पागेरे तसेच मुसळे यांचे पैकी एक असे जवळपास निश्चित झाले होते असे त्यांनी सांगितले मात्र ऐन वेळी ठाकरे यांनी दोघांना ही टाळून अड़ संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पागेरे हे नाराज असल्याची चर्चा त्यांच्या सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्ट वरुण दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -