घरमहाराष्ट्रनाशिककुस्त्यांसाठीही होते नाशिक प्रसिद्ध

कुस्त्यांसाठीही होते नाशिक प्रसिद्ध

Subscribe

नाशिकला धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर इतिहास आहे. नाशिक अर्थात गुलशनाबाद शहराच्या इतिहासाचा हा वैभवशाली खजिना नाशिक जिल्हा न्यायालयाचे निवृत्त सहायक अधीक्षक श्रीराम शिंगणे यांच्या लेखांद्वारे प्रसिद्ध करत आहोत. शहराच्या चौकांतील धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नाशिकला वैभवाप्रत नेण्यासाठी या चौकातील काही मान्यवरांची माहितीही या मालिकेतून प्रसिद्ध करत आहोत…

नाशिक शहरात पूर्वी अनेक तालमी, व्यायामशाळा व व्यायामाची ठिकाणे देखील अस्तित्वात होती. दांडेकर तालीम, बंडू उस्ताद तालीम, रोकडोबा तालीम, तसेच यशवंत, अहिल्याराम व्यायाम शाळा या सारख्या व्यायाम प्रेमी संस्था आजही अस्तित्वात आहे.नाशिक शहर त्याकाळी कुस्त्यांसाठी प्रसिद्ध होते. रोकडोबा, मोहन मास्तर, बंडू उस्ताद, दांडेकर, छापरीची, फुले, वाघाडी, घनकर गल्ली, फुले तालीम अशा सर्वच तालमीच्या मल्लानी नाशिकचे नाव उंचावले होते.
नाशिकमध्ये वरचेवर होणार्‍या कुस्त्यांचे दंगलीत देव, चंद्रकांत खैरे, अशोक वाबळे, दिलीप सहाणे, काळे, भट आदी पहिलवान मंडळी प्रसिद्ध होती. हे पहिलवान गडी मलखांब खेळण्यातही वाकबगार होते. लाठी फिरवणे,दांडपट्टा, तलवारबाजी आदी खेळांची प्रात्यक्षिके देखील निरनिराळ्या तालमितील पहिलवान गणपती विसर्जन मिरवणुकीत करीत असत. या शिवाय मलखांबवरील कसरती देखील करून दाखवीत असत.

- Advertisement -

त्याकाळी हुतुतू, खोखो, लिंगोरच्या, दांडपट्टा, व्हॉलीबॉल, टेनिस, वांग टांग, आट्या पाट्या, विट्टी दांडू, गोट्या आदी खेळ खेळले जात असत । आट्या पाट्या हा खेळ फार क्वचित खेळला जात असे. गोल्फ क्लब ग्राऊंडवर पूर्वी गोल्फ खेळला जात असे. मात्र, काळाच्या ओघात गोल्फ, आट्या पाट्या या सारखे खेळ बंद पडले आहेत. अनेकजण टेनिस, बडमिंटन सारखे खेळ मित्रविहार मध्ये खेळण्याचा आनंद लुटत. मात्र, हे खेळ श्रीमंतांची मक्तेदारी होती. क्रिकेटदेखील खेळले जात होते. तथापि, या खेळाला इतर खेळांइतकेच महत्व दिले जात होते. क्रिकेटमध्ये बापू नाडकर्णी यांनी नाव कमावले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच आजूबाजूला संघाच्या शाखा भरत असत. या शाखा प्रामुख्याने जुन्या नाशकात बुधवार पेठ, गंगेवरील यशवंत महाराज पटांगण, हत्तीखाना रोड, हायस्कूल ग्राउंड येथे भरत असत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -