घरमहाराष्ट्रनाशिकभुजबळ नकोच; नवा उमेदवार द्या

भुजबळ नकोच; नवा उमेदवार द्या

Subscribe

भालूर येथील बैठकीत नांदगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मांडली भूमिका

नांदगाव भुजबळां सोबत नांदगाव मतदारसंघात काम करणे शक्य नाही. दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असूनही जनतेचे प्रश्न सुटले नाही. पक्ष स्थापना काळापासून सोबत असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांचीही अवस्था चिंता करण्यासारखी आहे. भुजबळांनी निवडणूक लढवायची तर सगळ्यांनी मदत करायची. मात्र; पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत भुजबळ वेगळी भूमिका घेत असल्याने आता कुठल्याही परिस्थितीत पक्षाने उमेदवार बदलावा. मात्र, भुजबळ नकोच, अशी भूमिका जेष्ठ नेते साहेबराव पाटील यांच्या भालूर येथील निवासस्थानी झालेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बैठकीत मांडली.

बैठकीमुळे तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पक्षाचे कार्य म्हणून दहा वर्षे सगळे काही सोसणार्‍या कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडून दिले जाते, असा आरोप करण्यात आला. पक्षाने अन्य कुणालाही उमेदवारी दिली तरी भुजबळ नकोच त्यांच्याऐवजी नवा उमेदवार द्यावा. तसे नसेल तर मित्र पक्षालाही जागा सोडली तरी चालेल; मात्र भुजबळ नकोच. यावर बैठकीस उपस्थित वक्त्यांनी भर दिला. राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष दिलीप इनामदार, संतोष गुप्ता, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, मनमाडचे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, नांदगावचे माजी नगराध्यक्ष काका सोळसे, माजी सभापती राजेंद्र आहेर, धनंजय कमोदकर, विलास राजुळे, कांती छाजेड, विठोबा आहेर, नगरसेवक सुरज पाटील, राष्ट्रवादी युवकचे दत्तू पवार, अतुल पाटील, सतीश आहिरे यांच्यासह तालुक्याच्या विविध भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच व अन्य संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह आघाडीतल्या मित्र पक्षाचे भीमशक्तीचे मनोज चोपडे यांच्यासह उपस्थित होते.

- Advertisement -

नांदगाव तालुक्यावर अन्याय

मोठे भुजबळ तुरुंगात गेले तो तुमच्यावर अन्याय होता या अन्यायावर चर्चा घडवली गेली. आमदारांच्या निष्क्रियतेने व पीए संस्कृतीमुळे संपूर्ण तालुक्यावरच अन्याय झाला, याची चर्चा का केली जात नाही. आजच्या बैठकीनंतर दुसर्‍या टप्प्यात आघाडीतल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन भुजबळ कुठल्याही परिस्थितीत नकोच एवढ्याच मुद्यावर व्यापक बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याची तारीख लवकरच घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -