घरमहाराष्ट्रनाशिकखड्यात श्राद्ध घालत सत्ताधारी भाजपचा निषेध

खड्यात श्राद्ध घालत सत्ताधारी भाजपचा निषेध

Subscribe

नाशिक शहरातील रस्त्यांच्या दूरवस्थेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

नाशिक शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. एवढी दूरवस्था होऊनदेखील महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बिटको चौकातल्या खड्ड्यात श्राद्ध घालत भाजपचा निषेध करण्यात आला.

शहरातले बहुतांश रस्ते विविध विकासकामांच्या नावाखाली खोदण्यात आले आहेत. तसेच, पावसामुळेही रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरण्याचं काम महानगरपालिकेने ठेकेदारांना दिलंय. मात्र, हे खड्डे केवळ माती-मुरूम टाकून बुजवले जात असल्याने, सर्वदूर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढलंय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. खड्डेमुक्तीसाठी पक्षातर्फे सातत्याने पाठपुरावा केला जातोय. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही खड्ड्यात श्राद्ध घातल्याचं खैरे यांनी सांगितलं. या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -