घरमहाराष्ट्रकोरोना नियमाचं पालन करून राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून होणार सुरू

कोरोना नियमाचं पालन करून राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून होणार सुरू

Subscribe

कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्य सरकारनं हा निर्णय घेतला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून पालकांसह विद्यार्थ्यांकडून शाळा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून पुढील महिन्यात शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी कोरोनाचा असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता या निर्णयावर कोणतीही चर्चा करण्यात आली नव्हती आणि हा निर्णय स्थगित करण्यात आला होता. मात्र शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकराने नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी होकार दिला होता. अखेर मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवनंतर कोरोना स्थितीचा आढावा घेऊन सोबतच दिवाळी सारख्या मोठ्या सणाच्या दरम्यान कोरोना परिस्थिती पाहून दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल, असे चाइल्ड टास्क फोर्सकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर आता ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यास खुद्द मुख्यमंत्र्यांनीच परवानगी दिली आहे. जिल्हानिहाय कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. कोणत्या वर्गांच्या शाळा सुरु होणार यासंदर्भात अद्याप सविस्तर माहिती समोर आली नसली तरी गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.


Rain Update: राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, कोकणासह, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -