घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात कोसळला दुमजली वाडा

नाशकात कोसळला दुमजली वाडा

Subscribe

जुन्या नाशिकमधील अमरधाम रस्त्यावरील भोई गल्लीमधील घटना, धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

जुन्या नाशिकमधील अमरधाम रस्त्यावरील भोई गल्लीमधील कांबळे वाडा रविवारी, ७ जुलैला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कोसळला. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी मात्र टळली.

या वाड्याला महापालिकेने नोटीस बजावली होती. या वाड्याला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचे पथक वाड्याच्या पाहणीसाठी आलेले होते. त्याचवेळी वाड्याच्या एका बाजूचा धोका वाढल्याचे लक्षात घेऊन जवानांनी तातडीने वाड्यात राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. हे काम पूर्ण होते न होते तोच, कमकुवत झालेली वाड्याची एक बाजू पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली. यामुळे शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -