घरदेश-विदेश'बिग बॉस'फेम सपना चौधरीचा राजकीय प्रवेश

‘बिग बॉस’फेम सपना चौधरीचा राजकीय प्रवेश

Subscribe

प्रसिद्ध गायिका, नृत्यांगना सपना चौधरीने आज भाजपमध्ये प्रवेश केला.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायन आणि नृत्यकौशल्यामुळे बॉलिवूड, भोजपूरी, पंजाबी आणि हरयाणाच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केलेल्या बिग बॉस ११ ची स्पर्धक गायिका, नृत्यांगना सपना चौधरीने आज भाजपमध्ये प्रवेश केला. आज दिल्लीमध्ये आयोजित भाजपच्या सदस्यता अभियानादरम्यान सपना चौधरीचा भाजप प्रवेश झाला.

- Advertisement -

मनोज तिवारींच्या निवडणूक प्रचारांमध्ये सहभागी

लोकसभा निवडणूकांपूर्वी मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर सपना चौधरीने हे वृत्त फेटाळून लावले. त्यानंतर सपनाने दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांची भेट घेतली. यावेळीही सपनाने मी केवळ माझ्या मित्राला निवडणूकांच्या प्रचार-प्रसारासाठी मदत करणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर मनोज तिवारीच्या अनेक प्रचार रॅलींमध्ये सपना चौधरी दिसली होती.

हेही वाचा – ‘किंग खान’ची मुलगी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

बिग बॉस ११ ठरला टर्निंग पॉइंट

बिग बॉस ११च्या स्पर्धेत सपना चौधरी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिच्या स्पर्धेतील सहभागामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली. बिग बॉसनंतर सपना चौधरीने भोजपूरी, पंजाबी आणि हिंदी सिनेमात नृत्य केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -