घरक्राइमदोन सीटांच्या पोर्चमध्ये बसलेल्या प्रवाशांचाच गेला जीव

दोन सीटांच्या पोर्चमध्ये बसलेल्या प्रवाशांचाच गेला जीव

Subscribe

नाशिक : बसमध्ये जागा नसतानाही चालक प्रवाशांना घेताना पाहत होतो. दोन आसनांमधील रिकाम्या जागेत प्रवाशी मांडी घालून बसत होते. बसला आग लागल्याने दरवाजातून बाहेर पडणे शक्य नव्हते. ही आग झपाट्याने पुढे सरकत होती. जे लोक दोन सीटांमधील पोर्चमध्ये बसले होते, त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांचा जीव गेला, अशी आपबिती प्रवाशी सचिन जाधव यांनी सांगितली.

सचिन जाधव हे पत्नी अश्विनी (वय २६) सह गावी देवाचा नवस फेडण्यासाठी गेले होते. ते यवतमाळ जिल्ह्यातील पुसदपासून जवळच असलेल्या पिंपळगाव सूतगिरणीचे आहेत. नोकरीनिमित्त ते कल्याणला राहतात. ते सहा महिन्यांतून एकदा गावी जातात. ते कल्याणला रेल्वेच्या साइटवर कंत्राटी तत्त्वावर सुपरवायझर म्हणून काम करतात. साहेबांच्या नातलगाची प्रकृती गंभीर असल्याने कल्याणला कामावर जायचे होते. मात्र, त्यांना रेल्वेचे तिकिट मिलळाले नाही. शेवटी त्यांनी चिंतामणी ट्रॅव्हल्स बसचे तिकीट काढले. ते शुक्रवारी (दि.७) सायंकाळी 6.30 वाजता पुसद (जि.यवतमाळ) येथून पत्नीसह खासगी बसमध्ये बसले होते. त्यांनी गावावरून तांदूळ, बाजरीचे कट्टे सोबत घेतले होते. सर्व प्रवाशी साखरझोपेत असताना अपघात झाला. त्यावेळी जाधव यांना लोक जळताना दिसले. त्यांच्या पत्नीला खूप वेदना होत होत्या. त्यांनी तिला सावरून बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जीव वाचविण्यासाठी सीटाजवळील काच फोडली. तेथून पत्नीला खाली ढकलले. कपड्यांची बॅग फेकून ते बसच्या बाहेर आले. त्यावेळी त्यांचे धान्य आगीत जळून खाक झाले. मात्र, जीव वाचला, हीच देवाची आमच्यावरील कृपा असल्याचे जाधव दाम्पत्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -