घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांना शहर बससेवेचं पहिलं तिकिट मोफत

नाशिककरांना शहर बससेवेचं पहिलं तिकिट मोफत

Subscribe

डिजिटल पेमेंटसाठी जाहीर केली विशेष ऑफर

नाशिक :स्मार्ट सिटीअंतर्गत नाशिक महापालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद आहे. ८ जुलैपासून महापालिकेमार्फत ही सेवा सुरू करण्यात आली. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता सिटीलिंक बसद्वारे प्रवास करणार्‍या प्रवाशांना डिजिटल पेमेंटद्वारे तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून सिटीलिंकने नुकताच पेटीमएमसोबत करार केला. या सेवेचा लाभ घेणार्‍या प्रवाशांना डिजिटल पेमेंटद्वारे पहिले तिकिट मोफत दिले जाणार आहे.

नाशिक महापालिकेने शहर बससेवेसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे. शहरात सध्या ११५ बसेस धावत आहेत. सध्या प्रवाशांना ईटीएम मशीनद्वारे तिकिट देण्यात येते. परंतू आता पेटीएमद्वारे ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली आहेे. त्यामुळे प्रवासी पेटीएम वॉलेट, यूपीआय, नेट बँकिंग, कार्डसह सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंटचा वापर करू शकतात. या सुविधेमुळे पैशांचा प्रत्यक्ष वापर कमी होऊन व्यवहारात पारदर्शकता राहण्यास मदत होईल. या सेवेच्या शुभारंभप्रसंगी महापालिका आयुक्त कैलास जाधव, सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता बी. जी. माळी, महाव्यवस्थापक वसंत गायधनी, मिलिंद बंड, अंकित चौधरी, स्मृती रंजन, एनपीसीआय चे सुदिप्ता पट्टनायक, सिटीलिंकचे व्यवस्थापक राजेश वाघ, रंजीत ढाकणे, प्रकल्प संचालक संदीप लांजेवार, यशवंत नामसानी उपस्थित होते.

- Advertisement -

असा होईल फायदा

पेटीएमद्वारे तिकीट आगाऊ काढले जाऊ शकते. हे तिकिट मोबाईलमधून कंडक्टरचे ईटीएम मशीन क्युआर कोडद्वारे स्कॅन करून तपासता येते. पेटीएमद्वारे तिकीट काढल्याने प्रवाशांना अथवा सिटिलिंक कंपनीला कुठलेही कमिशन द्यावे लागणार नाही. या तिकीट विक्रीची रक्कम थेट नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या बँक खात्यात जमा होईल.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -