घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेची थकबाकी भरा; अन्यथा घरासमोर वाजणार ढोल

महापालिकेची थकबाकी भरा; अन्यथा घरासमोर वाजणार ढोल

Subscribe

नाशिक : महानगर पालिका प्रशासनाला दिवाळी व अन्य जुन्या योजनांचे लाभ देण्यासाठी शंभर कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. महसुली जमा कमी असल्याने आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. थकबाकी वसुलीसाठी सहाही विभागांतील बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून ती महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील एकूण १२५८ थकबाकीदारांच्या घरासमोर सोमवारी ढोल वाजवले जाणार आहे. जोपर्यंत थकबाकी जमा होत नाही तोपर्यंत हे ढोल वाजवले जाणार आहे. एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी बनवण्यात आली आहे. अश्या १२५८ थकबाकीदारांच्या घरासमोर ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यातच घरपट्टी, पाणीपट्टी आदि कर वसूली पूर्णत ठप्प आहे. करवसुली विभागाचे बहुतांश कर्मचारी मागील काही महिन्यात निवडणुकीच्या संबंधी तसेच इतर कामांमध्ये असल्याने करवसुलीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले त्यातून थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आता शहरातील एक लाखाहून अधिक रक्कमेच्या १२५८ थकबाकीदारांची यादी करण्यात आली आहे. ही यादी महनगर्पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्धही करण्यात आली आहे. वारंवार नोटिस पाठवून, तगादा लावूनही थकबाकी अदा न केल्याने अखेर महानगरपालिका प्रशासनाने थेट ढोल बाजाओ मोहीम हातात घेतली आहे.

- Advertisement -
सहा विभागात सहा पथके 

नाशिक महानगर्पालिकेच्या सहा विभागात सहा वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमांतून ही कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सहाही पथकांना एक ताशा तर दोन ढोल वादकांची उपलबद्धता करून देण्यात आली आहे. ढोल बाजाओ कारवाईचे चित्रीकरण केले जाणार असून जिओ टॅगिंग देखील केल जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -