घरमहाराष्ट्रनाशिकसावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार नितीन गडकरी यांना जाहीर

सावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार नितीन गडकरी यांना जाहीर

Subscribe

पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी नवी दिल्ली येथील गडकरींच्या निवासस्थानी

नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक(सावाना)तर्फे दरवर्षी माधवराव लिमये याच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा प्रतिष्ठेचा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार सन २०२०-२१ चा प्रथमच केंदिय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी (दि.१०) दुपारी १२.३० वाजता मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली येथे गडकरी यांच्या निवासस्थानी होणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ.सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे उपस्थितीत राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन सार्वजनिक वाचनालयाच्या फेसबुक पेजवरून प्रसारित करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक वाचानलायाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.

- Advertisement -

सावानातर्फे हा पुरस्कार महाराष्ट्रातील कार्यक्षम आमदार यांना दिला जात होता. यंदापासून या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून, वर्षाआड हे पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिले जाणार आहेत. ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे १८ वे वर्ष आहे. स्व.माधवराव लिमये हे नाशिकचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजवादी नेते होते. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. त्यांचा सार्वजनिक वाचानाल्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची कन्या डॉ.शोभा नेर्लीकर व जावई डॉ.विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सार्वजनिक वाचनालय, नाशिक दरवर्षी विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा यापैकी एका सदस्याची निवड ही कार्यक्षम आमदार/खासदार पुरस्कारासाठी निवड केली जाते.

पुरस्कार निवड समितीमध्ये खासदार हेमंत गोडसे, आमदार हेमंत टकले, पत्रकार सुरेखा टाकसाळे, पत्रकार जयप्रकाश पवार, अतुल कुलकर्णी, डॉ.विनायक नेर्लीकर, डॉ.शोभानेर्लीकर व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, डॉ.धर्माजी बोडके यांचा समावेश आहे. गत १७ वर्ष अनुक्रमे आमदार बी.टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर, शोभा फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, पांडुरंग फुंडकर, जयवंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू, निलम गोर्‍हे, गिरीश महाजन, धनंजय मुंडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -