घरमहाराष्ट्रनाशिकटीईटी घोटाळ्यातील 39 बोगस शिक्षकांचे वेतन बंद

टीईटी घोटाळ्यातील 39 बोगस शिक्षकांचे वेतन बंद

Subscribe

जिल्ह्यातील 27 पुरुष,12 महिलांचा समावेश, मात्र 39 शिक्षकांना मदत करणारे एजंट कोण ?

मालेगाव : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यात जिल्ह्यातील 39 शिक्षक आढळले असून त्यांचे वेतन तातडीने बंद करण्यात आले आहे. पवित्र समजल्या जाणार्‍या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. भविष्यात शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार संपवायचा असेल तर शासनाने आताच कडक कारवाई करत बोगस शिक्षक भरती करणारे संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्यावर अगोदर फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा,अन्यथा शिक्षण क्षेत्रातील किड शिक्षणाचा सत्यानाश केला शिवाय राहणार नाही.

महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्याचे लोन मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याने सर्वत्र खळबळ उडाली असतानाच नाशिक जिल्ह्यातील नामांकित संस्थांमध्येे 2019 च्या बोगस टीईटी प्रमाणपत्र यादीत बोगस टीईटी धारक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.
शिक्षण क्षेत्रातील तज्ञांकडून या यादीचे बारकाईने निरीक्षण सुरू असून या बोगस टीईटी प्रमाणपत्र यादीत नाशिक जिल्ह्यातील 39 बोगस शिक्षक ऑन ड्युटी आढळून आले आहेत. या 39 बोगस शिक्षकात 27 पुरुष तर 12 महिला आहेत. यात संस्थाचालक यांचे नातलग किती? संशोधनाचा विषय आहे.त्यात आणखीही वाढ होऊ शकते ते शोधले जात आहेत.

- Advertisement -

राज्यभरात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात नाशिकमधील 37 शिक्षकांसह दोन लिपिकांचे वेतन बंद करण्यात आले असून या बोगस शिक्षकांची यादी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने प्रसिद्ध केली आहे. यात 27 पुरुष व 12 महिला कर्मचार्‍यांचा समावेश आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह विविध उच्च पदस्थ अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर राज्यभरात सुमारे 7 हजार 800 शिक्षकांना बोगस टीईटी प्रमाणपत्र देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या बोगस टीईटी प्रमाणपत्र धारकांमध्ये नाशिकमधील 39 शिक्षकांचा समावेश असून त्यांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आता फक्त 2019 मधील या यादीतील बोगस टीईटी प्रमाणपत्र धारकांची यादी जाहीर झाली असून आजून 2017 आणि 2018 या दोन वर्षातील टीईटी यादी अद्याप जाहीर झालेली नाही. ती जाहीर होईल तेव्हा मात्र शैक्षणिक क्षेत्रात मोठा भूकंपच होणार आहे.

- Advertisement -

बोगस शिक्षकांची संख्या तालुकानिहाय

  • मालेगांव(5)
  • नांदगाव (5)
  • बागलाण (4)
  • चांदवड (8)
  • कळवण (03)
  • देवळा (1)
  • दिंडोरी(1)
  • नाशिक (6)
  • निफाड (3)
  • पेठ(1)
  • सिन्नर(1)
  • सुरगाणा(01)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -