घरमहाराष्ट्रनाशिकपुस्तकातील ग्रहमाला अवतरली वर्गात

पुस्तकातील ग्रहमाला अवतरली वर्गात

Subscribe

कमी होणाऱ्या पटसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळेचा अभिनव उपक्रम

खासगी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा खेडोपाड्यापर्यंत पोहचल्याने जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होताना दिसत आहे. या गोष्टीला आळा घालण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनाही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास कंबर कसली आहे. असाच नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणजे सूर्यमाला वर्गात आणून दाखवण्याचा उपक्रम तालुक्यातील भऊर शाळेत राबवल्याने विद्यार्थी चकित झाले.

नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा परिषद शिक्षक मेहनत घेताना दिसत आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून निरस वाटणारे विषय आवडीचे बनवण्याचे प्रयोग आता राबवले जात आहेत. असाच तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना खगोलीय शिक्षण देण्यासाठी प्ले स्टोरवर उपलब्ध अँपचा वापर करून क्यूबच्या साहाय्याने सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ या सारख्या ग्रहांची व अन्य माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पुस्तकातील ही ग्रहमाला प्रत्यक्ष वर्गात अवतलेली पाहून विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढले. मुख्याध्यापक रत्नमाला देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी बागुल यांनी हा उपक्रम राबवला.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक गोडी वाढेल

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पद्धतीत बदल होत असून नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून अध्यापन केले जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयक गोडी निर्माण होण्यास मदत नक्कीच मदत होईल. – दादा मोरे, सरपंच, भऊर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -