घरदेश-विदेश'पत्नीवर गोळ्या झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देणे चांगले'

‘पत्नीवर गोळ्या झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देणे चांगले’

Subscribe

पत्नीवर गोळ्या झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन नाते संपवणे कधीही चांगले, असे वादग्रस्त वक्तव्य सपाचे खासदार एस. टी. हसन यांनी केले आहे.

तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, पत्नीवर गोळ्या झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन नाते संपवणे कधीही चांगले, असे वादग्रस्त वक्तव्य सपाचे खासदार एस. टी. हसन यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु होणार आहे. तसेच कुठल्याही धर्माच्या वैयक्तिक बाबतीत सरकारने हस्तक्षेप करता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले सपाचे खासदार हसन

पती पत्नीमध्ये बऱ्याचदा वाद होतात. मात्र, कधी कधी या वादात अशी परिस्थीती निर्माण होते ज्यामध्ये पती पत्नीचा पारा चढतो. त्या वादाचे रुपांतर हाणामारीत होते आणि एकाचा कोणाची तरी त्यामध्ये नाहक बळी जातो. परंतु, या वादामुळे बळी जाण्यापेक्षा पती पत्नीने विभक्त होणे हा एक योग्य मार्ग उरतो. मग अशा परिस्थितीत पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तिला तिहेरी तलाक देणेच योग्य ठरते. तसेच केवळ हजरत अबू हनिफा यांना मानणारे लोकच एकावेळी तीन तलाक देतात. आता अबू हनिफांना मानणाऱ्यांसोबत निकाह करावा का? हे मुलीच्या कुटुंबीयांवरच सोडणे योग्य ठरेल‘, असे एसटी हसन यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – विवाहितेला तीन तलाक दिल्याने पतीला अटक


- Advertisement -

मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करणे चुकीचे

इस्लामने मुस्लिम महिलांसोबत खूप न्याय केलेला आहे. तसेच त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्या पतीसोबत राहू शकतात. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करणे आणि शरियतमध्ये बदल करणे चुकीचे आहे. जर कुठल्याही पुरुषाला तुम्ही तीन तलाक दिले म्हणून तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावत असाल तर तो आपल्या कुटुंबाला पोटगी कशी देऊ शकेल. हे चुकीचे नाही का? हिंदू आणि ख्रिश्चन पुरुषांना एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. मग मुस्लिमांना तीन वर्षांची शिक्षा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा – लोकसभेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयक सादर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -