घरक्राइमभद्रकालीत दगडफेक; तणावपूर्ण शांतता

भद्रकालीत दगडफेक; तणावपूर्ण शांतता

Subscribe

नाशिक : मुलांच्या भांडणातून दोन गटात वाद झाल्याची घटना रविवारी (दि.२१) भद्रकालीतील गंजमाळ पोलीस चौकी परिसरात घडली. या घटनेत काही तरुण जखमी झाले असून, वाहनाचे नुकसान झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद झाल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. वाद झाल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

गंजमाळ परिसरात अल्पवयीन मुलांच्या भांडणाचे रुपांतर दोन गटात झाले. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजमाळ पोलीस चौकीच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झोपडपट्टींमधील दोन गट समोरासमोर भिडले. रविवारी (दि.२१) संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. त्यात काही तरुण जखमी झाले. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गंजमाळ परिसरात तणावमय परिस्थिती निर्माण झाली होती. भद्रकाली पोलिसांसह दंगलनियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्याने तणाव निवाळला. रात्री उशीरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी भद्रकालीत तळ ठोकून होते. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -