घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपांडवलेणीवरुण ३वर्षीय चिमूरडी आणि पिता कोसळले

पांडवलेणीवरुण ३वर्षीय चिमूरडी आणि पिता कोसळले

Subscribe

नाशिक : पांडवलेणी पाहण्यासाठी आलेले मुंबईचे पर्यटक लेणी बघताना तीन वर्षांच्या मुलीसह पाय घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. नाशिक क्लाइंबर्स अ‍ॅण्ड रेस्क्यू टीमने त्या दोघांना सुखरूप वर काढून तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यामुळे दोघांचाही जीव वाचला. ही घटना शनिवारी (दि. २०) दुपारी १२.३० वाजता पांडवलेणीच्या २० क्रमांकाच्या लेणीजवळ घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईच्या मरोळ येथील साबियो साँचेस (४०) हे आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह पांडवलेणी बघण्यासाठी आले होते. ट्रेकिंगचा अनुभव नसताना ते डोंगरावर गेले. पावसामुळे डोंगराची जागा ओलसर झाल्याने ते पाय घसरून खाली पडले. मुलीचा हात त्यांच्या हातात असल्याने तिच्यासह ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू पथकाचे दयानंद कोळी, नीलेश पवार, चंद्रकांत कुंभार, ओम उगले, अक्षय गाडगीळ हे घटनास्थळी दाखल झाले. दुसरी टीम अभिजित वाकचौरे, ऋषिकेश वाकचौरे, अजय पाटील, वेदांत वाणी यांनी साहित्य घेऊन मदत सुरू केली. तीन तासांच्या परिश्रमाने जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -