घरमहाराष्ट्रनाशिकश्रीगोंदा तहसीलदार प्रांगणात दोन गटांत दगडफेक

श्रीगोंदा तहसीलदार प्रांगणात दोन गटांत दगडफेक

Subscribe

दोन जण जखमी; अनेक दुचाकींचे मोठे नुकसान

श्रीगोंदा: येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात तांदळी दुमाला आणि अजनुज येथील आदिवासी समाजातील दोन गटांमध्ये वादविवाद होऊन दगडफेक करण्यात आली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्या दगडफेकीत अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील तांदळी दुमाला व अजनुज येथील आदिवासीच्या दोन गटांमध्ये तुफान वादविवाद होऊन या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यात एकाला कानाला दुखापत झाली आहे, तर दुसर्‍याला डोळ्याला दुखापत झाली आहे. तसेच इतर जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्या ठिकाणी अनेक दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

तसेच तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या चहाच्या दुकानदारांना दगडफेकीत दगड लागले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. यानंतर पळापळ झाली. पोलिसांनी जमाव फैलवला, मात्र तालुक्याच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात दगडफेक झाल्याने श्रीगोंदा तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी आपला कायद्याचा वचक दाखवण्याची गरज निर्माण झाली असून, पोलीस गस्त तसेच प्रबोधन वाढवण्याची मागणी सजग नागरिकांकडून केली जात आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -